जिनीव्हा : जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ डाॅ. सौम्या स्वामिनाथन यांच्या मते, ५० ते ६० टक्के लोकांना कोरोनाची बाधा होऊन जेव्हा ते बरे होतील. तेव्हा कोरोनाविरोधी सामुहिक रोगप्रतिकारशक्ती तयार होईल. मात्र कोरोना व्हायरसच्या साथीच्या आणखी काही लाटा आल्यानंतरच या प्रक्रियेला सुरवात होईल.
सामुहिक रोगप्रतिकारशक्ती तयार झाली तर या कोरोना व्हायरसवर आपण मात करू शकतो, असा नवा दावा आता जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येत आहे. सामुहिक रोगप्रतिकारशक्ती तयार झाल्यानं व्हायरसची संक्रमण साखळी सुटते. मात्र नैसर्गिकरीत्या संक्रमण साखळी तुटण्यापेक्षा लसीच्या सहाय्याने हे काम झालं तर उत्तम.
नैसर्गिकरीत्या साखळी तोडण्यासाठी बरेच लोकांना जीव गमावण्याचा धोका वाढतो, असं मत स्वामिनाथन यांनी व्यक्त केलं. सोशल डिस्टसिंग व योग्य उपचार पद्धती महत्वाची आहे. कोरोना व्हायरसच्या आणखी काही मानवी चाचण्या यशस्वी झाल्या तर यावर्षाअखेरीस लस उपलब्ध होऊ शकते, असंही स्वामिनाथन यांनी म्हटलं.