पनवेल (संजय कदम) : घरातून कोणाला काहीही न सांगता 70 वर्षीय महिला कोठेतरी निघून गेली आहे. त्यामुळे ती हरवली असल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लता अरविंद वालवालकर यांची उंची पाच फूट सहा इंच, रंग गोरा आहे. त्या अंगाने सडपातळ असून अंगात लाल चौकडी रंगाचा शर्ट व तपकिरी रंगाची पँट घातली आहे. पायात निळ्या पांढऱ्या रंगाची स्लीपर आहे. या महिलेबाबत अधिक माहिती असल्यास खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नवनाथ नरळे यांच्याशी संपर्क साधावा.