Reliance Jio : सादर केले 5 धमाकेदार प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंगसह मिळेल भरपूर डेटा

jio

PEN टाइम्स ऑनलाईन टीम : रिलायन्स जियोने आपल्या ग्राहकांसाठी पाच नवीन प्लॅन सादर केले आहेत. रिलायन्स जियोचे नवीन प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग आणि रोजच्या डेटा लिमिटविना येतात. या प्लॅन्सच्या मदतीने जियो ग्राहक कोणत्याही मर्यादेविना कधीही अनलिमिटेड डेटा वापरू शकतील. रिलायन्स जियोचे नवीन प्लॅन्स 127 रुपये, 247 रुपये, 447 रुपये, 597 रुपये आणि 2,397 रुपयांमध्ये सादर करण्यात आले आहेत.

127 रुपयांचा प्लॅन……….

रिलायन्स जियोच्या या नवीन प्लॅनमध्ये युजर्सना अनलमिटेड ऑडियो कॉलिंग, रोज 100 SMS आणि जिओ अ‍ॅप्सचा फ्री अ‍ॅक्सेस मिळतो. या प्लॅनची वैधता 15 दिवस आहे, यात 12GB डेटा मिळतो. या डेटासाठी कोणतीही डेली लिमिट नाही.

247 रुपयांचा प्लॅन………..

या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना 30 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये युजर्सना कोणत्याही FUP मर्यादेविना 25GB डेटा मिळतो. या प्लॅनचे इतर फायदे 127 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे आहेत.

447 रुपयांचा प्लॅन……….

रिलायन्स जियोच्या 447 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 60 दिवसांची वैधता मिळते. तसेच, या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 50GB डेटा मिळतो. 127 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे यात देखील इतर फायदे मिळतात.

597 रुपयांचा प्लॅन………

जियोचा 597 रुपयांचा हा नवीन प्रीपेड प्लॅन 90 दिवस वैध राहतो. 75GB डेटा असलेल्या या प्लॅनचे इतर फायदे 127 रुपयांच्या प्लॅन सारखेच आहेत.

2397 रुपयांचा प्लॅन……….

रिलायन्स जियोने 2,397 रुपयांचा प्लॅन वार्षिक वैधतेसह सादर केला आहे. हा प्लॅन ग्राहकांना 365 दिवस वापरता येतो. तसेच, या प्लॅनमध्ये युजर्सना 365GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये देखील कोणतीही डेली लिमिट देण्यात आली नाही. या प्लॅनमधील इतर फायदे 127 रुपयांच्या प्लॅन सारखे आहेत.