Samsung चा F62 झाला स्वस्त, 7000mAh बॅटरी, 64MP कॅमेरा; Flipkart आणि SBI कडून विशेष ऑफऱ

samsung-62f

PEN टाइम्स ऑनलाईन टीम : भारतात Samsung Galaxy F62 लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्ये 7000 एमएएच बॅटरी आणि 64 मेगापिक्सेल कॅमेरा अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच, यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज देखील देण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या Flipkart च्या सेलमध्ये Samsung Galaxy F62 हा स्मार्टफोन अधिक सवलतीत ग्राहकांना विक्री करण्यात येत आहे. या फ्लिपकार्ट सेलमध्ये ज्याला स्टे होम शॉप सेफ असे नाव देण्यात आले आहे, या फोनची विक्री 16 जूनपर्यंत चालणार आहे. या विक्रीत भारतीय स्टेट बँक (SBI) बँक क्रेडिट कार्डधारकांना विशेष सूट देण्यात येत आहे. हा फोन दमदार बॅटरीसह उपलब्ध असून त्याला चार्ज करण्यासाठी 25 डब्ल्यू जलद चार्जर देण्यात आला आहे.

फ्लिपकार्टवर SAMSUNG Galaxy F62 (6GB Ram, 128GB storage) ची किंमत 23,999 रुपये आहे आणि एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यास तुम्ही 750 रुपयांपर्यंत बचत करू शकता, तर एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय असा पर्याय तुम्ही निवडल्यास जास्तीत जास्त 1000 रुपयांपर्यंत तुम्ही बचत करू शकणार आहात.

Samsung Galaxy F62 फीचर्स……….

Samsung Galaxy F62 मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी + सुपर एमोलेड प्लस इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन 1080 × 2400 रिजोल्यूशनसह येते. या फोनमध्ये Exynos 9825 चिपसेट देण्यात आली आहे, जी 8 जीबी रॅमसह येते. या फोनमध्ये 1 टेराबाइट मायक्रोएसडी कार्ड युजर्सना इन्सर्ट करता येणार आहे.

Samsung Galaxy F62 च्या बॅक साईडला चार कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे, जो Sony IMX682 सेन्सरचा आहे. यामध्ये 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेन्सर आहे, ज्याला अल्ट्रा वाइड एंगल लेन्स असून तो 123-डिग्री फील्ड व्ह्यू कॅप्चर करू शकतो. यातला तिसरा कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आणि चौथा कॅमेरा देखील 5 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे.