WhatsApp चॅट डिलीट न करता हाईड करायचंय का, मग जाणून घ्या ही सोपी पद्धत

whatsapp

नवी दिल्ली : सध्या मेसेजिंगसाठी सर्वात जास्त व्हॉट्सअ‍ॅप वापरले जात आहे. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये अनेक असे कॉन्टॅक्ट असतात ज्यांच्याशी तुम्ही सीक्रेट चॅट करता आणि तुम्हाला वाटत असेल की, तुमच्याशिवाय इतर कुणी ते चॅट वाचू नये, यासाठी आज आम्ही येथे एक अशी जबरदस्त ट्रिक सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही आपले खासगी चॅट डिलीट न करता सहजपणे लपवू शकता. जाणून घेवूयात पद्धत…

असे करा व्हॉट्सअ‍ॅप चॅट हाईड………

* व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि यानंतर ज्यांचे चॅट हाईड करायचे आहे त्यावर क्लिक करा.
* आता त्या चॅटवर टॅप करून होल्ड करा. यानंतर वरच्या बाजूला काही पर्याय समोर येतील. यापैकी एक एरोचा पर्याय असेल जो तीन डॉट्सच्या एकदम मधोमध आहे आणि तेच आर्चिव्ह बटन आहे.
* आचिव्ह बटनवर टॅप करा. यावर टॅप करताच तुमचे चॅट आर्चिव्ह होईल. आणि कुणालाही दिसणार नाही.
* जेव्हा हे चॅट तुम्हाला पहायचे असेल तेव्हा व्हॉट्सअ‍ॅप चॅमध्ये सर्वात खाली स्क्रूल करावे लागेल, जिथे अर्चिव्हचा पर्याय असेल.
* यावर टॅप करून तुम्ही अर्चिव्ह केलेले चॅट मिळेल. जर तुम्हाला ते अनअर्चिव्ह करायचे असेल तर त्यास टॅप करून होल्ड करा आणि वर दिलेल्या आचिव्ह आयकॉनला पुन्हा एकदा टॅप करा. यामुळे तुमची चॅट अनअर्चिव्ह होईल.

व्हॉट्सअ‍ॅपचे अपकमिंग फिचर………

व्हॉट्सअ‍ॅप आपले खास डिसअ‍ॅप्पीयर मॅसेज फीचर अपग्रेड करत आहे. अपग्रेडेशननंतर युजर्सचे मॅसेज 24 तासानंतर आपोआप डिलीट होतील. सध्या हे फिचर केवळ 7 दिवसांच्या कालावधीसाठी आहे.