हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी रिकाम्यापोटी प्या ‘हा’ स्पेशल ज्यूस

heart

नवी दिल्ली : ह्रदय शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. शरीराच्या सर्व भागात रक्त पोहचवणे, सर्व भागातून रक्त घेणे, रक्त पंप करणे अशी महत्वाचे कामे हृदय करते. हे काम करताना हृदय आकुंचन आणि प्रसरण पावत असते. या कार्यात बाधा आल्यास हृदयसंबंधी आजारांचा धोका वाढतो. यासाठी योग्य दिनचर्या, योग्य आहार आणि रोज व्यायाम करा. सोबतच रोज सकाळी रिकाम्यापोटी हा स्पेशल ज्यूस प्या. जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर जाणून घेवूयात…

रिसर्च गेटवर प्रसिद्ध एका शोधात या फळाबाबत सविस्तर सांगण्यात आले आहे. या फळात आयुर्वेदिक गुण आढळतात जे आरोग्यासाठी लाभदायक आहेत. विशेषकरून लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, तणाव आणि हृदयासंबंधी आजारासाठी हे फळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. डॉक्टरसुद्धा किवीचा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.

संशोधनात सांगितले आहे की, किवीमध्ये पोटॅशियम आणि फायबर आढळते. याच्या सेवनाने हृदय निरोगी राहते. किवीतील फायबर वाढत्या कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करते. यामुळे हृदयसंबंधी आजार आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. यासाठी कोरोना काळात रोज रिकाम्यापोटी किवी ज्यूस प्या. याशिवाय रिसर्च गेटवर प्रसिद्ध एका अन्य संशोधनात उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी आठवड्यात 8 किवी खाण्याचा सल्ला दिला आहे.