Coronavirus recovery : कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर शरीरात कमजोरी असेल तर करा हे 7 उपचार

corona-mukta

नवी दिल्ली : कोरोनातून बरे झाल्यानंतर शरीरात खुप जास्त कमजोरी असते. अशावेळी चांगला आहार घेणे आवश्यक आहे. कमजोरीचे सर्वात मोठे कारण असते पौष्टिक आहार सेवन न करणे. तुम्ही सुद्धा कोरोनातून रिकव्हर झाला असाल परंतु शरीरात कमजोरी खुप आहे तर काही खास डाएट टिप्स अवलंबा.

असा घ्या आहार……..

1 डब्ल्यूएचओनुसार पौष्टिक आहारात ताजी फळे, डाळी, बीन्स, हिरव्या भाज्या, मका, बाजरी, गहू आणि बटाटा सेवन करा.
2 व्हिटॅमिन सी, डी, मिनरल्स आणि झिंक असलेले पदार्थसेवन करा.
3 हलका आहार घ्या. ताजे अन्न खा.
4 आंबट फळे सेवन करा.
5 सकाळी एक खजूर, दोन बदाम, मुठभर मनुके आणि दोन आक्रोड खा. हा सुकामेवा रात्री भिजत टाका आणि सकाळी खा.
6 इम्युनिटी वाढवण्यासाठी हलका व्यायाम करा. हळुहळु वॉकने सुरूवात करा.
7 सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपा.

या गोष्टी लक्षात ठेवा ………..

* रिकव्हर झाल्यानंतर सुद्धा मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा.
* रिकव्हरीनंतर आठवड्यानंतर सुद्धा ऑक्सीजन, ब्लड प्रेशर आणि ताप तपासा.
* डायबिटिक असाल तर दिवसात दोन वेळा शुगर टेस्ट करा.
* शरीर हायड्रेट ठेवा. पाणी प्या, लिंबूपाणी, ताक प्या.
* गॅझेट्सचा वार मर्यादित करा. टीव्ही सुद्धा कमी पहा.