मुंबईसह रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता; 7 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

rain

मुंबई : मागील काही दिवासापासून महाराष्ट्रात पावसानं दाणदाण केली आहे. सर्वच जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबईत तर पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. तर आज सकाळपासूनच मुंबईमध्ये रिमझिम पाऊस बरसत आहे. तर आज दुपारी चार पासून मुंबईत  पाऊस  आणखी जोर धरणार आहे. मुंबईस रायगडमध्येही जोरदार पाऊसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उद्या सकाळी साडेआठ पर्यंत मुंबईतील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे हवामान विभागाकडून मुंबईला अलर्ट दिल आहे. तसेच मुंबईसहित 7 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज (बुधवारी) मुंबईसह, रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे, पालघर आणि सातारा या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट  दिला आहे. म्हणून आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाट ठिकाणी मुसळधार पावसाला जोर धरणार आहे. यातच पावसासह ढगांसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार आहे.

तसेच, आज कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि नाशिक या 3 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट  जारी करण्यात आला आहे. मात्र, कोकण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आगामी 48 तासांसाठी कोकणाला हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला आहे.

दरम्यान, मुंबई कोकण भागासह आता मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याबरोबरच मराठवाड्यात देखील मध्यम पावसाची सुरुवात होणार आहे.
मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्याच्या परिसरात देखील हवामान खात्यानेरेड अलर्ट जारी केला आहे.

या दरम्यान, उद्या सकाळी साडे आठ वाजल्यानंतर मुंबईत ऑरेंज अलर्ट असणार असल्याची माहिती.
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिलीय.