राष्ट्रवादीच्या पेण विधानसभा मतदार संघ उपाध्यक्षपदी विलास चौलकर

mahesh10

नागोठणे (महेश पवार) : नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पेण सुधागड रोहा विधानसभा मतदार संघ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्वादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्या सहीचे नियुक्ती पत्र विलास चौलकर यांना कर्जत येथे रविवारी(दि.१८) संपन्न झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले.

नागोठण्याचे माजी सरपंच व कट्टर शिवसैनिक विलास चौलकर यांनी नुकताच नागोठण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले होते व चौलकर यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल असा शब्द दिला होता. त्यानुसारच विलास चौलकर यांच्या पक्ष प्रवेशाचे फलित म्हणून तसेच त्यांची क्रियाशील वृत्ती पाहून खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाने रायगड पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या शिफारशीने चौलकर यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या समवेत पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकरशेठ पाटील, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा गीता पालरेचा, युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, नागोठणे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान विलास चौलकर यांच्या नियुक्ती बद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला असून आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. विलास चौलकर यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
विलास चौलकर यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात चौलकर त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांच्या आशीर्वादाने खासदार सुनिल तटकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना अधिकाधिक बलवान करण्यासाठी आपण जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्नशील राहाल हीच अपेक्षा आपल्याकडून असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.