अरबाज खान मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर झालेल्या ‘त्या’ गोष्टीचा केला खुलासा

arbaj-&-malaika

मुंबई : अरबाज खान मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर झालेल्या गोष्टीचा खुलासा केला आहे. 1998 मध्ये अरबाज आणि मलाइका अरोराचं लग्न झालं. 2017 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. नुकत्याच आपल्या एका मुलाखतीत अरबाज खान त्याच्या घटस्फोटाविषयी खुलेपणाने बोलला आहे. अरबाज खान म्हणाला, ‘या वायफळ गोष्टी आहेत. ज्या लोकं करतात. काय तुम्ही खऱ्या आयुष्यात असा विचार करता की, आपण जितकं जास्त बोलता त्याने परिस्थिती बदल जाएगी? माझ्या वैयक्तिक आयुष्यात, मी आधीच या उलथापालथातून गेलो आहे, मी परिस्थिती स्वीकारली आहे आणि त्यातून पुढे गेलो आहे. आपण सगळे चुकलो आहोत. आणि आपण चुका करतो.

याचबरोबर अमीर खान आणि किरण राव यांच्या नुकत्याच झालेल्या घटस्फोटांचं उदाहरण देत अरबाज खान म्हणाला, ‘कदाचित चाहते, जर एखाद्या कपलला पसंत करत असतील तर त्यांना ते नेहमीच एकत्र दिसायला हवे असतात. आणि अलीकडेच आमिर खानसोबत देखील असंच घडलं. मात्र याचा अर्थ असा नाही की, आपण वाईट लोकं आहोत. तिथे विचार करणारे दोघेच आहेत ज्यांना असं वाटतं की, ते एकत्र का आहेत.

अरबाज पुढे म्हणाला, ‘कधीकधी आपल्यासमोर वेगवेगळे रस्ते असतात, आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोक बनता. आपल्याला त्यांना पुढे जावू द्यायचं आहे आणि आनंदी रहायचं आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांच्या कमेंन्टचा, विशेषत: माझ्या नातेसंबंधांवर माझा कधीच प्रभाव पडला नाही. अर्थातच, मलाही वाटतं त्या गोष्टीदेखील आवश्यक नव्हत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जावं लागतं.”

अरबाज नुकताच आपल्या टॉक शो पिंचच्या नवीन सीझनसह परत आला आहे. सलमान खान या सिझनमधील त्याचा पहिला पाहुणा आहे. त्यांच्या पाहुण्यांच्या यादीत अनन्या पांडे, फराह खान यांच्यासह इतर अनेक स्टार्सची नावे आहेत.