पोलादपूर शहरात उत्तरवाहिनी सावित्री नदी रस्त्यावर; धोक्याच्या पातळीजवळ रानबाजिरे धरण

palkar7

पोलादपूर (शैलेश पालकर) : शहरात बुधवारी सायंकाळी उत्तरवाहिनी सावित्री नदी यंदा प्रथमच रस्त्यावर आली. याचदरम्यान, रानबाजिरे येथील एमआयडीसीचे धरण धोक्याच्या पातळीच्या अगदीच जवळ भरून वाहू लागले असल्याने सर्व आपत्कालीन यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

पोलादपूर तालुक्यात गेल्या 24 तासांतील पावसाची नोंद केवळ 64 मी.मी. असताना बुधवारी दुपारनंतर पावसाने मुसळधार हजेरी लावली. याचदरम्यान पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी ते कोतवाल, कुडपण व ओंबळी भागासह पळचिल, कोंढवी, भोगाव, धामणदिवी येथून येणारी चोळई तसेच कापडे खुर्द, चांभारगणी, कापडे बुद्रुक येथील घोडवनी तसेच देवळे भागातून ढवळी तर कामथे बोरघर भागातून कामथी नद्यांच्या परिसरात जोरदार पाऊस पडल्याने सर्व नद्यांचे पाणी सावित्री नदीला येऊन मिळाले. यामुळे सावित्री नदी पात्रात पूरस्थितीत वाढ होऊन पोलादपूर नजिक रानबाजिरे येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या धरणाची पातळी सायंकाळी 57.60 मीटर्स एवढी वाढली. या धरणाची धोक्याची पातळी 58 मीटर असल्याने प्रशासन तसेच पोलीसांनी सर्व आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासाठी आदेश दिले आहेत. पोलादपूर शहरातील उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पात्र गंगामाता घाटावरील पहिल्या पायरीला लागले तर त्यापुढे जुन्या महाबळेश्वर रस्त्यावर गणेशमंदिरासमोरील चरईकडे जाणाऱ्या नदीपात्रातील पायवाटेजवळ जुन्या पोस्ट ऑफिसजवळील स्मशानरस्त्यावर सावित्री नदी खळाळून वाहू लागली.

साधारणत: पोलादपूर शहराबाहेरील उंबरकोंड रस्त्याच्या फाटयासमोर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या सावित्री नदीपात्रात भराव करून नरवीर ढाब्यापासून काही अंतरावर एलऍंडटी कंपनीने महामार्ग करताना काँक्रीटची संरक्षक भिंत उभारल्याने नदीपात्र तुडूंब भरून दुथडी वाहू लागले आहे. पुढे सप्तक्रोशी विभागात माटवणजवळ रस्ता पाण्याखाली गेला असल्याने वाहतूक ठप्प झाली. मात्र,पिंपळपार मारूतीच्या कडेच्या घाटावरील पाषाणात कोरलेली श्रीगणपतीची मुर्ती उत्तरवाहिनी सावित्री नदीच्या पुराच्या पाण्यात बुडाली नसल्याने महाड शहरात पुरस्थिती उदभवली नसेल, अशी खात्री वर्तविली जात असते. मात्र, यादरम्यान पोलादपूर नगरपंचायतीने शहरातील पथदिवे बंद