TATA नेक्सॉन ईव्हीला टक्कर देणार ‘ही’ कार, सिंगल चार्जमध्ये धावणार 375KM

car

PEN टाइम्स ऑनलाईन टीम : देशात सध्या पेट्रोल, डीझेलचे दर गगनाला भिडलेत. त्यामुळे गाडी चालविणे महागात पडायला लागले आहे. त्यालाच पर्याय म्हणून सर्वजण इलेक्ट्रिकल वाहनांकडे पाहिले जात आहे. यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. याच दिशेने सध्या पावले उचलली जात असून नागरिकांना सुद्धा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, तसेच दुचाकी इलेक्ट्रिक गाड्या सुद्धा नागरिकांना खिशाला परवडतील अशा किंमतीत उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. सध्या भारतात इलेक्ट्रिक कारचे लिमिटेड अॅडिशन आहेत. त्यामध्ये टाटा नेक्सॉन ईवी, ह्युंदाई कोना आणि एमजी जेडएस ईवीचा समावेश आहे. मात्र येणाऱ्या दिवसात भारतात इलेक्ट्रिक कारच्या बाजारात तेजी येईल अशी अपेक्षा केली जात आहे.

भारतात ज्या कार विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यामध्ये टाटा मोटर्सची नेक्सॉन ईवी ग्राहकांची पसंद ठरली आहे. मात्र लवकरच टाटा नेक्सॉनला टक्कर देण्यासाठी होमग्रोन ऑटोमेकर महिंद्रा अॅन्ड महिंद्रा आपली इलेक्ट्रिक ईएक्सयुवी 300 उतरवणार आहे. पारंपरिक इंधन असणाऱ्या कारच्या यादीमध्ये टाटा नेक्सॉन सब- कॉम्पॅक्ट एसयुवी आणि त्याची सेगमेंटची एक्सयुवी 300 मध्ये टक्कर होणार असण्याची शक्यता आहे.

ईएक्सयुवी 300 बद्दल बोलायचे झाल्यास ही एक हाय रेंज कार असणार आहे. त्यामध्ये चार्ज करण्यासाठी कमीत कमी वेळ लागणार आहे. ही कार महिंद्रा एक्सयुवी 300 च्या डिझाइनवर आधारित असणार आहे. माहितीसाठी लक्षात असू द्या की, सिंगल चार्जमध्ये ही कार 375 किमी पर्यंत चालवता येणार आहे. eXUV300 ला महिंद्रा स्केलेबल अॅन्ड मॉड्युलर आर्किटेक्चरवर तयार केली आहे. याचे इंटिरियर मध्ये नवे मोठे पॉप आउट स्टाइल टचस्क्रिन इंन्फोटेन्मेंट सिस्टम, नवी सीट अपहोल्ट्री, वायरलेस चार्जर, नवे स्टिअरिंग व्हिलचा समावेश असू शकतो. याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास ती 15-18 लाखादरम्यान असू शकते. या कारची टक्कर सुद्धा भारतातील टाटा कडून लॉन्च करण्यात येणाऱ्या टाटा अल्ट्रोज ईओवी सोबत होण्याची शक्यता आहे.