अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन

akshay-kumar

मुंबई : अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन झाले आहे. आजसकाळी  बुधवारी (8 सप्टेंबर) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारने ही दु:खद बातमी स्वत: सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. अक्षय काही दिवसापूर्वीच आईला भेटण्यासाठी भारतात परतला होता.

अक्षय कुमारच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदरच त्याच्या आईने या जगाचा निरोप घेतला आहे. अक्षयने मंगळवारी आपल्या चाहत्यांना विनंती केली होती की, माझ्या आईच्या प्रकृतीच्या चिंतेत तुम्हा सर्वांना पाहून मी भावनिक झालो आहे. ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी कठिण वेळ आहे. तुमच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे.