निरोगी जीवन जगायचे असेल तर ‘या’ 4 वाईट सवयी तर तात्काळ बदला; भविष्यात होऊ शकतो आरोग्याला धोका !

bad-habits

Pen टाइम्स ऑनलाइन टीम : धावपळीच्या जीवनात काही लोक वाईट सवयी बाळगातात, ज्या ठराविक काळानंतर घातक ठरतात. अशा वाईट सवयी वेळीच सुधारल्या नाहीत तर नंतर पश्चाताप करण्याशिवाय हातात काहीही राहात नाही, कारण या सवयी तुम्हाला अनेक आजार देऊ शकतात. यासाठी वेळीच अशा सवयी सोडल्या पाहिजेत, या सवयी कोणत्या ते जाणून घेवूयात…

1. अल्कोहलचे सेवन……….. 

अल्कोहलच्या सेवनाने शारीरीक आणि मानसिक दोन्ही आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे लिव्हर खराब होतो, हृदयरोग, डिप्रेशन आणि कॅन्सर होऊ शकतो.

2. धूम्रपान करणे………. 

स्मोकिंग म्हणजे धूम्रपान आरोग्यासाठी घात आहे. यामुळे कॅन्सर होऊ शकतो. वेळीच ही सवय सोडा.

3. जास्त पेनकिलर्सचे सेवन करणे ……….. 

छोट्या-छोट्या आरोग्य समस्यांसाठी सतत पेनकिलर्स सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर आणि हार्टअटॅकचा धोका वाढतो. जास्त पेनकिलर्स सेवन करू नका.

4. वेळेवर झोपा आणि चांगली झोप घ्या…………. 

काही लोक रात्री जागरण करतात, यामुळे झोप पूर्ण होत नाही. कमी झोपेचा परिणाम आरोग्यावर होतो. चिडचिडेपणा, डिप्रेशन वाढते. हाय ब्लड प्रेशर होऊ शकते. यासाठी 8 तास झोप घ्या.