काश्मीरमधून भारतीय लष्कर हटवले तर तिथे सुद्धा तालिबान येईल – ब्रिटिश खासदार (व्हिडीओ)

british

लंडन : ब्रिटनच्या एका खासदाराने म्हटले की, जर भारतीय लष्कर काश्मीर मधून हटवले तर तिथे सुद्धा तालिबान सारखा निजाम उभा राहू शकतो. लंडनची संसद हाऊस ऑफ कॉमन्स  मध्ये खासदार बॉब ब्लॅकमन यांनी म्हटले की, भारतीय लष्कर काश्मीरमध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी दृढ आहे. जर तेथून लष्कर बाहेर पडले तर अफगाणिस्तानप्रमाणे काश्मीरमध्ये सुद्धा इस्लामिक शक्ती लोकशाही बरबाद करतील.

भाषणाचा व्हिडिओ वायरल…………. 

बॉब यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी अफगाणिस्तानचे उदाहरण देत म्हटले की, तिथे काय झाले आहे, हे आपल्याला माहित आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ वायरल होत आहे.

काश्मीमध्ये मानवाधिकाराच्या स्थितीवर चर्चा………..  

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ब्रिटिश खासदार डेब्बी अब्राहम आणि मुळ पाकिस्तानी वंशाच्या खासदार यास्मिन कुरेशी काश्मीरमध्ये मानवाधिकाराच्या स्थितीवर चर्चा करत होते.

जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग……….. 

यावेळी खासदार बॉब ब्लॅकमनने यांनी म्हटले की, केवळ भारतीय लष्कर आणि त्याची ताकद आहे. ज्याने जम्मू आणि काश्मीरला तालिबानच्या कब्जातील अफगाणिस्तान बनण्यापासून रोखले आहे. त्यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीर भारताचा कायदेशीर आणि अधिकृत प्रकारे अविभाज्य भाग आहे.

काय होते पूर्ण प्रकरण…………  

ब्रिटनमध्ये खासदारांनी चर्चेसाठी ‘काश्मीरमध्ये मानवाधिकार’ वर एक प्रस्ताव ठेवला आहे. यावर भारताने कठोर प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, देशाच्या अविभाज्य भागांशी संबंधीत विषयावर कोणत्याही मंचावर करण्यात आलेल्या दाव्यास पुराव्यासह प्रमाणित करण्याची आवश्यकता आहे.

ब्रिटनमध्ये काश्मीरवर ‘ऑल पार्टी पार्लियामेंट्री ग्रुप’ (एपीपीजी) च्या खासदारांनी हा प्रस्ताव ठेवला आहे. परदेश, राष्ट्रमंडळ आणि विकास कार्यालयात आशियाच्या मंत्री अमांडा मिलिंग यांनी चर्चेत द्विपक्षीय मुद्द्याप्रमाणे काश्मीरवर ब्रिटन सरकारच्या भूमिकेत कोणताही बदल न आल्याबाबतचा पुनरूल्लेख केला.

ब्रिटनची मध्यस्थी नाही…………  

मिलिंग यांनी म्हटले की, सरकार काश्मीरमधील स्थितीला अतिशय गांभीर्याने घेते, परंतु भारत आणि पाकिस्तानलाच काश्मीरी लोकांच्या इच्छेचा सन्मान करत स्थायी राजकीय तोडगा शोधावा लागेल. ब्रिटनची जबाबदारी यावर कोणताही तोडगा किंवा मध्यस्थी म्हणून काम करण्याची नाही.