अनैतिक संबंधातून अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म

rape

पुणे :  एक वर्षापासून सुरु असलेल्या अनैतिक संबंधातून एका 17 वर्षाच्या मुलीने मुलाला जन्म दिला असून सिंहगड रोड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

याप्रकरणी मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 17 वर्षाची मुलगी आणि आरोपी यांचे एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मुलीची इच्छा नसताना तिचे सोबत बळजबरीने शरीरसंबंध केले. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली होती. तिने नुकताच एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर फिर्यादी यांनी डॉक्टरांकडे जाऊन माहिती घेतली. मुलीला विश्वासात घेऊन चर्चा केल्यानंतर फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी 376 सह पोक्सो अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.