आता आधार कार्डद्वारे घरच्या घरी मिळेल पर्सनल लोन; असा करा अर्ज

adhar-card

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक जण बेरोजगार झालेत कित्येकांच्या हाताला काम नाही. छोटं काय सुरू करायचं म्हटलं तर पैशाची कमतरता, पण आता हताश व्हायचा कारण नाही. कारण बँक आपल्या फक्त आधार कार्डवर पर्सनल लोन देते. बरचशे असे लोक आहेत ज्यांना माहिती अभावी कर्ज घेता येत नाही. ही बातमी अशाच लोकांसाठी आहे. तुम्ही आधार कार्डवर पर्सनल लोन घेऊ शकता.

सर्व मोठ्या बँका देत आहेत आधार कार्ड वर Personal Loan……………..  

जवळपास सर्वच बँका आधार कार्डवर पर्सनल लोनची सुविधा देत आहेत. यासाठी तुमच्याकडे कोणतेही कोलॅटरल मागितले जात नाही. म्हणजे काहीही गहाण ठेवावे लागत नाही. तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असतील तर आणि क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर काही मिनिटात कर्ज मिळेल. 23 ते 60 वर्षापर्यंतचे लोक असे कर्ज घेऊ शकतात.

पर्सनल लोन On आधार कार्ड Process………………  

 आधार कार्डमधील सर्व माहिती योग्य असल्याचे पडताळून पहा.

 पसंतीच्या बँकेच्या वेबसाइटवर किंवा अ‍ॅपवर जा.

 बँकेच्या वेबसाईटवर पर्सनल लोनचा पर्याय मिळेल.

 बँक तुमची पात्रता तपासेल.

 पात्रता चेक करण्यासाठी दिलेला फॉर्म योग्यप्रकारे भरा.

 काही मिनिटात निकाल सांगितला जाईल.

 पात्र असल्यास अर्ज करण्याचा पर्याय मिळेल. किती लोन मिळेल हे सुद्धा समजेल.

 रोजगार, उत्पन्न इत्यादी माहिती द्यावी लागेल. यासाठी एक फॉर्म भरावा लागेल.

 ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून फोन येईल.

 फोनवर व्हेरिफिकेशन केल्यावर पुढील स्टेप येईल.

 आता आधार कार्डची कॉपी मागितली जाईल.

 आधार कार्डची पडताळणी होताच बँक लोन कन्फर्म करेल.

 यानंतर काही वेळात प्रोसेसिंग फी कापून कर्जाची रक्कम खात्यात पाठवली जाईल.