‘ED’ चा कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडला दणका, 700 कोटीचे शेयर केले जप्त

ed

नवी दिल्ली : EDने शनिवारी म्हटले की, कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड म्हणजे केएसबीएल (Karvy Stock Broking Limited) चे सीएमडी सी. पार्थसारथी आणि इतरांविरूद्ध मनी लाँड्रिंगच्या चौकशी अंतर्गत छापेमारीनंतर 700 कोटी रुपयांच्या शेयरच्या व्यवहारावर प्रतिबंध लावला आहे. मागील महिन्यात तेलंगना पोलीसांनी अटक केल्यानंतर पार्थसारथी सध्या हैद्राबादच्या चंचल गुडा जेलमध्ये बंद आहेत.

एजन्सीने एका वक्तव्यात म्हटले की, ईडीने 22 सप्टेंबरला हैद्राबादमध्ये सहा ठिकाणी आणि कार्वी ग्रुपच्या कंपनीचे विविध परिसर, संबंधित संस्था आणि सी पार्थसारथी यांच्या रहिवाशी ठिकाणांवर छापेमारी केली होती. संपत्तीचे कागदपत्र, खासगी डायर्‍या, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ईमेल इत्यादीच्या रूपात गुन्हा सिद्ध करणारे पुरावे जप्त केले आहेत आणि त्यांची चौकशी केली जात आहे.

एजन्सीने म्हटले, यावरून विश्वसनीय प्रकारे समजते की, सी पार्थसारथी वैयक्तिक सौद्यांच्या माध्यमातून ग्रुपच्या कंपन्यांमध्ये आपले शेयर उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशाप्रकारे पुढील चौकशीपर्यंत गुन्हा रोखण्यासाठी, ईडीने 24 सप्टेंबरला व्यवहारांवरील प्रतिबंधासंबंधीत आदेश जारी केला आहे आणि 2019-20 साठी मूल्यांकन केले असता या शेयरचे मुल्य 700 कोटी रुपये असल्याचे आढळून आले.

इण्डसइंड आणि ICICI बँकांची कोट्यवधीची फसवणूक…………..  

कार्वी ग्रुपचे हे शेयर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रकारे सीएमडी कोमांदूर पार्थसारथी, त्यांची मुले रजत पार्थसारथी आणि अधिराज पार्थसारथी आणि त्यांच्या संस्थाच्या संबंधीत होते. ईडीने म्हटले, इण्डसइंड बँकेच्या 137 कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी हैद्राबाद पोलीसांच्या केंद्रीय गुन्हे ठाण्यात आणखी एक एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि सायबराबाद पोलीस अधिकार्‍यांनी ICICI बँकेच्या 562.5 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एक FIR नोंदवला आहे.

अवैध प्रकारे घेतलेले कर्ज बनले NPA……………..

EDने या सर्व FIRचा आपल्या तपासात समावेश केला आहे आणि जेलमध्ये सी. पार्थसारथी यांचा जबाब नोंदवला आहे. एजन्सीने म्हटले की, सी पार्थसारथी यांच्या नेतृत्वात केएसबीएलने ‘अति अनियमितता’ केली होती आणि सर्व अवैध प्रकारे घेतलेली कर्ज एनपीए झाली आहेत.

एकच मोडस ऑपरेंडीद्वारे अनेक बँकांकडून कर्ज…………..  

ईडीने म्हटले की, इतर बँका आणि व्यक्तीगत शेयरधारक/गुंतवणुकदारांकडून सुद्धा एफआयआर नोंदवला जात आहे. एजन्सीने म्हटले की, एकच मोडस ऑपरेंडीचा वापर करून अनेक बँकांकडून घेतलेले एकुण कर्ज सुमारे 2,873 कोटी रुपये आहे. सोबतच सांगितले की, एनएसई आणि सेबी सुद्धा केएसबीएलच्या प्रकरणांची चौकशी करत आहे.