डायबिटीज, हाय BP पासून दूर होण्यासाठी करा ‘या’ 5 वस्तूंचे सेवन

tup

PEN टाइम्सऑनलाइन टीम : भारतातील जवळपास प्रत्येक घरातील स्वयंपाक घरात तूप पहायला मिळेल. डाळ, कडी, भाजी किंवा भाकरीसह लोकांना ते खायला आवडते. तूप जेवणाचा स्वाद वाढवते शिवाय आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. हेल्थ एक्सपर्टनुसार, तूपासोबत काही वस्तूंचे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे.

1. हळदीचे तूप———-

हळदीचे तूप आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. यामुळे वजन कमी होते, नवीन रक्तपेशी तयार होतात, हृदय निरोगी राहते, किडनी फंक्शन व्यवस्थित होते, सूजची समस्या दूर होते, वेदना दूर करते.

2. तुळशीचे तूप———–

तूप बनवताना त्यामध्ये तुळशीची पाने टाकल्यास त्याची गुणकारी तत्व वाढतात. इम्यूनिटी बूस्ट होते, कॉमन फ्लू, रेस्पिरेटरीची समस्या, ब्लड शुगर कमी करण्यात मदत होते.

3. कापूरचे तूप———–

कापूर-तूपमुळे डायजेशन सुधारते, आतड्यांचे आरोग्य सुधारते, ताप, हार्टरेट आणि अस्थमासंबंधी समस्येपासून आराम मिळतो.

4. लसूनचे तूप———–

गार्लिक बटरप्रमाणे तूपासह लसून सुद्धा स्वाद आणि चव वाढवते. लसणातील गुणकारी तत्व इनफ्लेमेशनसंबंधी समस्यांपासून दिलासा देतात, तसेच हाय ब्लड प्रेशरच्या समस्येत फायदा होतो. नियमितपणे याचे सेवन केल्याने शरीराला मोठे फायदे होतात.

5. दालचीनी तूप———-

एका पॅनमध्ये थोडे तूप आणि दालचीनीच्या काड्या मध्यम आचेवर 4-5 मिनिटापर्यंत गरम करा आणि नंतर थोडावेळ थंड होऊ द्या. यामुळे शरीराला असंख्य लाभ होतात.