बोटं मोडण्याची सवय चांगली की वाईट? जाणून घ्या यामुळे होणारे फायदे आणि नुकसान

bot-modane

PEN टाइम्स ऑनलाइन टीम : लोकांना नेहमी रिकाम्या वेळेत बोटे मोडण्याची सवय असते. कदाचित तुम्हाला सुद्धा ही सवय असू शकते. घरातील ज्येष्ठ नेहमी मोठ्यांना आणि लहानांना बोटे मोडण्यापासून रोखत असतात. पण याचे कारण विचारले तर त्याचे उत्तर मिळत नाही. बोटे मोडणे चांगली सवय आहे की वाईट आणि तिचे फायदे, नुकसान याविषयी जाणून घेवूयात…

चांगली सवय आहे की वाईट————-

ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर समरजीत चक्रवर्ती यांनी द हेल्थ साईटला सांगितले की, असे करणे चांगली सवय नाही आणि वाईटदेखील नाही. असे म्हटले जाते की बोटे मोडल्याने ताप, सांध्यामध्ये वेदना अशा समस्या होऊ शकतात, परंतु डॉक्टर सांगतात, अशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. याबाबत कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. परंतु अनेक आरोग्य संशोधनात दावा करण्यात आला आहे की, सांध्यात वेदनेची समस्या होऊ शकते.

बोटे मोडताना का येतो आवाज————

आपले शरीर आणि अवयव अनेक अनेक हाडे एकत्र जोडली जाऊन तयार होते. बोटांच्या दोन हाडांमध्ये एक लिक्विड भरलेले असते, जे हाडांमध्ये एक प्रकारे ग्रीसिंगचे काम करते. हे लिगामेंट सायनोवायल फ्लूएड असते आणि ते हाडांच्या हालचालीसाठी आवश्यक असते. जेव्हा वारंवार बोटे मोडली जातात तेव्हा हे लिगामेंट कमी होऊ लागते आणि हाडे एकमेकांवर घासू लागतात. हाडांमध्ये भरलेले कार्बन डाय ऑक्सईडचे बबल फुटू लागतात. असे होणे आणि हाडे एकमेकांवर घासल्याने आवाज येतो.

सांध्यामधील वेदनांशी संबंध आहे का————

बोटे मोडल्याने सांध्याच्या आजूबाजूच्या मसल्सला आराम मिळतो. यासाठी लोक बोटे मोडतात. काही हेल्थ स्टडीजमध्ये म्हटले आहे की, वारंवार बोटे मोडल्याने तणाव होतो आणि लिगामेंट्सच्या सीक्रिशनला प्रभावित करतो. हाडांमध्ये घर्षण निर्माण झाल्याने काही काळाने आर्थरायटिसची समस्या होऊ शकते.

यामुळे सांधे मुलायम होऊ शकतात————

तर डॉक्टर सांगतात की, सांध्यामधील वेदनांशी याचा काहीही विशेष संबंध नाही. अनेक प्रकरणात तर यामुळे सांधे मुलायम होऊ शकतात. आणि हे हायपर-मोबाइल जॉइंटचे कारण ठरू  शकते. क्लासिकल एराचे प्रसिद्ध व्हॉयलिन वादक आणि कंपोझर निकोलो पगानिनी मारफन सिंड्रोम मुळेच पीडित होते, परंतु त्यांची बोटे लांब होती आणि ते आपल्या हायपर-मोबाइल जॉईंटमुळे त्या काळात खुपच सहजपणे व्हॉयलिन वाजवत असत.