रा.जि.प शाळा कामथ येथे राष्ट्रीय पोषण महा सप्ताह संपन्न

kolad21

कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील रा.जि.प शाळा कामथ येथे राष्ट्रीय पोषण महा सप्ताह उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले, त्यामध्ये वृक्षारोपण, स्वयंपाकी/ पालक पाककृती स्पर्धा, रानभाज्यांचे प्रदर्शन घेऊन त्यांचे महत्व विद्यार्थांनी सांगणे, खाऊचे एकमेकात शेअर करणे इ. उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली . कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख खेमसिंग चव्हाण, शा. व्य. समिती अध्यक्ष सौ.सेजल सुतार, शाळेच्या मुख्याध्यापक सौ. रेशमा प्रशांत वाघचौरे ,शिक्षिका श्रीम.अंजली अरविंद गुंजोटे तसेच माजी सरपंच सौ . मेघा निळेकर , अंगणवाडी सेविका सौ.जयश्री सानप, आशा कार्यकर्ती सौ. विद्या निळेकर, रामचंद्र सानप, मदतनीस अलका महाडिक व सुमती निळेकर , सविता निळेकर पालकवर्ग-मंगल जाधव, जयश्री जाधव, शेवंती मोरे, रेणुका वाघमारे, उषा पवार, ललिता पवार, वनिता पवार, मंगला जाधव, ममता जाधव, दिपाली पवार, गीता पवार, हौशी वाघमारे, सुरेखा जाधव, सीता पवार, गंगू वाघमारे सर्व ग्रामस्थ तसेच बालचमू उपस्थित होते .

आयोजित वप्रदर्शनात मोड आलेली कडधान्ये, धान्ये, मसाले, पापड, फळे, फळभाज्या, पालेभाज्या, सुकामेवा, तसेच चविष्ट अन्नपदार्थ यामध्ये, ज्वारीची भाकरी, ठेचा, शेंगदाण्याची चटणी, दही, इडली चटणी, अप्पे चटणी, घावणे, ढोकळा ,उपमा, ताक, गुलाबजाम, कढी, मोदक, अळूच्या वड्या, मिठाई, मासांहारी कालवण, वडे, शाबूची खीर, लोणचे अशा अनेक पदार्थांचा मुलांनी आस्वाद घेतला.

यावेळी सदर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव कसा मिळेल विविध फळ, भाज्या आणि पौष्टिक तसेच जीवनसत्व असणाऱ्या पदार्थाची ओळख कशी होईल आणि त्यांच्या ज्ञानात भर कशी पडेल या दृष्टीने शाळेच्या शिक्षिका सौ. अंजली गुंजोटे यांनी विशेष लक्ष देऊन व मेहनतीने विविध पदार्थ तयार केले.