भाजपा व युवा मोर्चा तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

uran20

उरण ( विठ्ठल ममताबादे ) : कोविड 19 या वैश्विक महामारीशी लढणाऱ्या भारतीयांसाठी आणि महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा उरण तालुकाच्या वतीने उरण शहरातील तेरापंथी सभागृह वाणीआळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला.एकूण 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी,शहाणवाज मुकादम -कोकण विभाग प्रमुख अल्पसंख्याक मोर्चा,जितेंद्र पाटील -जिल्हा उपाध्यक्ष,चंद्रकांत घरत -रायगड जिल्हा चिटणीस,जसीम इस्माईल गयास -अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष,नगराध्यक्ष-सायली म्हात्रे,रवीशेठ भोईर -भाजपा उरण तालुकाध्यक्ष,प्रकाश ठाकूर -तालुका उपाध्यक्ष,सुनील पाटील -तालुका सरचिटणीस,शेखर पाटील-उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष,नगरसेवक -कौशिक शहा,हितेश शहा -संयोजक भाजपा व्यापारी आघाडी,अजित भिंडे-सहसेक्रेटरी व्यापारी आघाडी,मनोहर सहातीया -सह संयोजक व्यापारी आघाडी,हस्तीमल मेहता -सेक्रेटरी व्यापारी आघाडी,कुणाल शिसोदिया-व्यापारी आघाडी सदस्य,शशी पाटील -पूर्व विभाग अध्यक्ष,कल्पेश म्हात्रे -युवा सचिव पूर्व विभाग, सुरज ठवले -युवा मोर्चा सदस्य,अविनाश भोईर -बूथ प्रमुख कोटनाका,प्रीतम पाटील -बूथ प्रमुख,सदानंद गायकवाड -लायन्स क्लब उरण चेअरमन,सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील, प्रसाद मांडेलकर, बाबुलाल सांखला आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा उरण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ डी वाय पाटील ब्लड बँक यांच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकी जपत ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी भाजपा उरण तालुका व युवा मोर्चा उरण तालुक्याचे पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.