केंद्र शासना विरोधातील भारत बंदमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पूर्ण ताकदीने सहभागी होणार – जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत

 

pen2

पेण ( राजेश प्रधान ) : संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या 27 सप्टेंबर रोजी च्या भारत बंद मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पूर्ण ताकदीने सहभागी होईल. केंद्र शासनाने शेतकरी विरोधी 3 काळे कायदे करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. तसेच रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, केंद्र शासनाच्या मालकीचे सार्वजनिक उद्योग, दूरसंचार आणि बंदरे इत्यादी गोष्टी विकण्याचा सपाटा लावला असून प्रतिवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचेेे आश्‍वासन न पाळता उलट युवकांना बेरोजगार केले. वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ यामुळे जनता त्रस्त झाली आहे.

अदानी, अंबानींना आर्थिक लाभ मिळवून देण्याकरिता केंद्र शासनाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचेेे धोरण अवलंबल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते भारत बंद मध्ये सक्रिय सहभाग घेऊन विरोध दर्शविणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी पेण येथे आयोजित त्यांच्या सत्कार समारंभाच्या प्रसंगी केले.

या कार्यक्रमाला रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा श्रद्धा ठाकूर प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील नंदा म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, बापूसाहेब नेने, बापू आठवले, अशोक मोकल, काका ठाकूर जे.टी.पाटील, अध्यक्ष पाटील, सूर्यकांत पाटील, निलेश पाटील, परशुराम म्हात्रे, अशोक मुंढे आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की महागाई व एकाधिकारशाहीने जनता त्रस्त झाली असून आगामी निवडणुकांमध्ये जनता भाजपला घरी बसवल्या शिवाय राहणार नाही भाजपचे जहाज लवकरच बुडणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना यश निश्चित मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला

पेण विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाचे 62 हजार मध्ये असून व शिवसेनेचे 45 हजार मते असून या मतांच्या जोरावरच भाजपचे विद्यमान आमदार निवडून आल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

गावागावात काँग्रेसची गाव समिती स्थापन करून जुने नवे कार्यकर्ते जोडा निवडणुकीच्या मतपेटीत आपली ताकद दाखवून द्या गटबाजी सोडून पक्षनिष्ठा राखा एकत्र येऊन काम करा पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही ऑफिसमध्ये बसून वल्गना करण्यापेक्षा जनसामान्यांमध्ये उतरून जनतेची कामे करा असे आवाहन घरत यांनी केले.