कोलाड लायन्सक्लबची सामाजिक बांधिलकी खांब चिल्हे देवकान्हे विभागातील साखरचौथ गणपती उत्सवाला दिली सदिच्छा भेट

kolad3

कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील खांब चिल्हे देवकान्हे विभागातील खांब नडवली तळवली तर्फे अष्टमी चिल्हे धानकान्हे देवकान्हे आणि बाहे मुठवली खुर्द या गावात सार्वजनिक संकष्टी चतुर्थी निमित्त साखरचौथीच्या गणरायाची प्रतिष्ठापना पूजन करून हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

kolad4

आध्यत्मिक आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या या विभागातील या उत्सवा निमित्ताने सदिच्छा भेट व सामाजिक बांधिलकी जपत लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाचे सेक्रेटरी रवींद्र लोखंडे, खजिनदार रायगड भूषण डॉ श्यामभाऊ लोखंडे,क्लब डायरेक्टर गजानन बामणे, क्लब एक्टिव्हिटी पर्सन नंदू कळमकर, विश्वास निकम, महेश तुपकर ,अलंकार खांडेकर, आदी पदाधिकारी वर्गानी गणेश उत्सव मंडळाला भेट देत गणरायांचे दर्शन घेतले तसेच तरुणांचा रंगतदार भजन तर महिलांचा फेरा नाच आशा विविध कार्यक्रमांचे कौतुक केले तर ग्रामीण भागातील खांब देवकान्हे विभागात मोठ्या उत्साहात वातावरणात हा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला ,