नागोठणे पोयनाड रस्त्यावर मोकाट गुरांचा मुक्त संचार….. वाहन चालकास ठरतेय डोकेदुखी

manjula

शिहू ( मंजुळा म्हात्रे ) : नागोठणे पोयनाड रस्त्यावर बेनसेवाडी ते कुहिरे दरम्यान मोकाट गुरांचा ठिकठिकाणी रस्ता रोको पाहायला मिळत आहे, मात्र वाहन चालकांना मार्गक्रमण करताना डोकेदुखी ठरत आहे अशातच अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

नागोठणे ते पोयनाड दरम्यान नेहमी दोनचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ चालू असते, परंतु मोकाट गुरांचा वावर ठिकठिकाणी ठिय्या मांडून बसलेला असतो. पावसाळ्यात शेतीची कामं झाल्यानंतर गुरांना मोकाट सोडली जातात. ही गुर रस्त्याचा आधार घेऊन ठाण मांडून बसलेली असतात अशातच या रस्त्यातून जाणाऱ्या वाहनचालकास मार्ग काढतांना दमछाक उडते जर एखादा अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल वाहन चालक व प्रवाशांकडून होत आहे.