दररोज गरम पाण्यात आंघोळ करताय व्हा सावध ! संशोधनातून समोर आली ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या !

bath

नवी दिल्ली : एका नवीन संशोधनातून समोर आले आहे की, थंड पाण्याने आंघोळ करणार्‍या लोकांमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणार्‍या लोकांच्या तुलनेत जास्त रोगप्रतिकारशक्ती असते. ब्रिटनच्या हर्टफोर्डशायर युनिव्हर्सिटीत रिडर इन एक्सरसाईज अँड हेल्थ सायकोलॉजीच्या लिंडे बॉटम्स हॅटफील्ड यांनी सांगितले हे संशोधन 3000 लोकांवर करण्यात आले.

रोगप्रतिकारशक्ती वाढण्याचे कारण——–

संशोधनात आढळले की, ज्या गटाने थंड पाण्याने आंघोळ केली होती, त्यांच्यात आजारपणामुळे सुटी घेण्याच्या प्रकरणात 29 टक्के घट झाली होती. मात्र थंड पाण्याने आंघोळ करणे आणि कमी आजारी पडणे याचे कारण समोर आलेले नाही. काही संशोधक म्हणतात याचे कारण रोगप्रतिकारशक्ती वाढणे असू शकते.

नॉरएड्रेनालाईन हार्मोन वाढतात———

थंड पाण्याने आंघोळ केल्याने मज्जासंस्था सक्रिय होतात, तर नॉरएड्रेनालाईन हार्मोन मध्ये वाढ होते. थंड पाण्याने आंघोळ करताना हृदयाची गती आणि रक्तदाब वाढण्याचे सर्वात मोठे कारण हे हार्मोन आहे. थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताभिसरण चांगले होते. त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते.

संशोधनात आढळले आहे की, 14 डिग्री सेल्सियस तापमानाच्या थंड पाण्याने आंघोळ केल्याने चयापचयमध्ये 350 टक्के वाढ होते. शारीरीक फायद्यांशिवाय मेंटल हेल्थला सुद्धा फायदा होतो. मात्र, थंड पाण्याने आंघोळ सुरूवात करण्यापूर्वी हे माहित असावे की याची काही जोखीम सुद्धा आहेत.
कारण अचानक पडणार्‍या थंड पाण्याने शरीराला एक झटका जाणवतो आणि तो हृदयच्या रूग्णांसाठी धोकादायक असतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.