धक्कादायक ! 43 वर्षाच्या महिला लष्करी अधिकार्‍यांची गळफास घेऊन आत्महत्या !

galfas

पुणे : पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये आलेल्या लष्करातील एका लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुल हे महाराष्ट्रातील एक अतिशय लोकप्रिय कॉलेज आहे. या संस्थेची स्थापना 1950 मध्ये करण्यात आली आहे. येथील संस्थेत 9 वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी लेफ्टनंट कर्नल महिला आली होती. 43 वर्षाच्या या महिला लष्करी अधिकार्‍यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे केले हे अद्याप समोर आले नाही. त्या ठिकाणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी तसेच वानवडी पोलिसांनी भेट दिली आहे.

हा प्रकार लष्करातील अधिकार्‍यांसंबंधी असल्याने याबाबत अधिकृतपणे पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र, एका लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या महिला अधिकार्‍यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले आहे यामुळे लष्करामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 43 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिलेने कैटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पण याबाबत सखोल तपास केला जात आहे.

दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्या गुन्हा दाखल केला जात आहे. मात्र, त्याची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.