वैशाली पाटील नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित !

uran29

उरण ( विठ्ठल ममताबादे ) : उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती, विद्यमान पंचायत समिती सदस्य वैशाली निलेश पाटील यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र संदेश न्यूज चॅनेलने वैशाली पाटील यांना नवदुर्गा सन्मान पुरस्कार 2021 देऊन सन्मानित केले आहे. यावेळी मल्टी मीडिया (PRESS )सामाजिक संस्था पनवेल यांनीही त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला आहे.

नवरात्री निमित्त समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा महाराष्ट्र संदेश या युट्युब चॅनेल द्वारे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उरण मधील राजकारण क्षेत्रात सक्रिय असलेल्या वैशाली पाटील यांना हा पुरस्कार मिळाला आहे. कोरोना काळात रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, कोरोनाची लस नागरिकांना उपलब्ध करून देणे, एखाद्या महिलेवर अन्याय झाल्यास त्याविरोधात आवाज उठविणे, महिलांना स्वावलंबी बनविणे, उपसभापती पदावर असताना प्रशासनाच्या माध्यमातून विविध समस्या सोडविणे आदी कार्य त्यांनी केले आहे. वैशाली निलेश पाटील या शेतकरी कामगार पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. वैशाली पाटील यांनी आपल्या प्रगतीचे सारे श्रेय त्यांचे पती निलेश पाटील, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या सोसायटी मध्ये राहणारे सर्व नागरिक, माजी आमदार विवेक पाटील यांना दिले आहेत.

वैशाली पाटील यांना नवदुर्गा पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.