उरण तालुका स्तरीय किल्ले स्पर्धेचे आयोजन !

gad-kille

उरण ( विठ्ठल ममताबादे ) : श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्याचे प्रसार, प्रचार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे उरण तालुका मर्यादित भव्य असे किल्ले स्पर्धा 2021 चे आयोजन करण्यात आले आहे.श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची, कार्याची ओळख व्हावी, गड किल्ले यांच्याविषयी समाजात आवड निर्माण व्हावी. गड किल्ल्याचे संवर्धन संरक्षण व्हावे, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांसमोर आणण्यासाठी हे गड किल्ले स्पर्धा घेण्यात येत असून दिवाळी दरम्यान बनविलेले गड किल्ले यांची संपूर्ण माहिती, फोटो , किल्ला बनविणाऱ्या बालकांची नावे किंवा ग्रुपचे नाव, संपर्क क्रमांक आदी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील -8097100073,

कार्याध्यक्ष -पत्रकार विठ्ठल ममताबादे व्हाट्सअप नंबर 9702751098 यांच्या व्हाट्सअप वर पाठवावे.

प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ 2 असे एकूण 5 विजयी उमेदवारांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.फक्त उरण तालुक्यातील विद्यार्थी, नागरिक यांना यात भाग घेता येईल. उरण तालुक्या बाहेरील विद्यार्थी, नागरिकांनी संपर्क साधू नये. किंवा किल्ल्याचे फोटो पाठवू नयेत.जास्तीत जास्त उरण तालुक्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.