कोव्हिड – १९ सारख्या महामारीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुमारे दोन वर्षाने रसिकांच्या विक्रमी उपस्थितीत संपन्न झालेला जागर नमन कलेचा,निमित्त होत आबीटगाव खालचीवाडी ( ता चिपळूण,जि.रत्नागिरी ) यांच्या वाडीपूजे निम्मित श्री चण्डिकाई नाट्य नमन मंडळ आबीटगाव,( खालची वाडी ),नमन लोककला जोपासणारे हुरहुन्नरी व्यक्तिमत्त्व नमन सम्राट दत्ताराम हुंबरे यांचे बहुरंगी नमन, तालुक्यातील एक लोकप्रिय नमन म्हणून आज ही तोच दबदबा आणि दरारा आहे हे सदर कार्यक्रमाच्या दिवशी दाखवून दिलं, बक्षिसांचा जणू पाऊसच पडला विक्रमी रेकॉर्ड आपल्या नावावर केला ही या नमन मंडळाची वेगळी छाप आहे, शेतीवाडी छोटी मोठी काम करणारा हा बळीराजा दिवसभर राबून संध्याकाळी तालीम करताना गावोगावी दिसत आहेत असेच हे आबीटगाव खालची वाडी मधील मेहनती आणि हाडाचे कलाकार आणि सगळ्यांची एक मोट बांधणारे दिग्दर्शक दत्ताराम हुंबरे गेली तीस ते पस्तीस वर्ष ही सेवा आवडीने करून रसिकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत.
त्यांनी बनवलेलं गणपतीचे देखावे हे आज जिल्ह्यातील अनेक नमन मंडळामध्ये पाहायला मिळतात,त्यांच्या मंडळाने सादर केलेले नमन(दि.१२ फेब्रुवारी २०२२) ही रसिकांना वेगळीच मेजवानी ठरली त्यातील गणपतीची अद्भुत आरास सजावट उत्तम आणि श्रवणीय गौळण,गायक विजय खेराडे याच्या मधुर आवाजात गायन बळीराजा हुबेहूब देखावा आणि या सगळ्यात उजवी ठरली श्री कृष्णाची भूमिका करणारी सात वर्षाची कुमारी अनन्या विजय खेराडे ही छोटी कलाकार हिच्यात वडिलांचे गायनातील गुण लेकिमध्ये उतरले आहेत तिने गायलेले श्री कृष्ण अवतार गीत हे या हे सोशल मीडियावर खूपच गाजत आहे या वयात सुरांची पकड ही दैवी देणगीच आहे. अशीच चर्चा सध्या नमन रसिकात रंगली आहे एकंदरीत एवढ्या मोठ्या जनसमुदायाला या बालिकेने मंत्रमुग्ध केले.तीच भरभरून अभिनंदन आणि तिच्या कौतुकास निःशब्दच…..!
लेखक-
शाहीर – सचिन धुमक (ढाकमोली)
संकलन- शांताराम गुडेकर