दम्याची ही आहेत 8 लक्षणे, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जरूर वाचा

damaa

PEN टाइम्स ऑनलाइन टीम : दमा हा श्वसन तंत्राशी निगडीत आजार असून यामध्ये श्वसननलिकेत सूज आल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे छातीत योग्य प्रमाणात ऑक्सिजन न पोहोचल्याने श्वास भरुन येतो. हा आजार कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. वृद्धांमध्ये हा आजार जास्त दिसून येतो. बदललेली जीवनशैली, वाढते शहरीकरण यामुळे लहान मुलांमध्येही हा आजार बळावत आहे. याचे लक्षणे आणि उपचार यासंबंधी माहिती जाणून घेवूयात.

ही आहेत लक्षणे

1 व्यायाम करताना श्वास भरुन येणे
2 जोरजोरात श्वास घेणे, थकवा येणे
3 श्वास घेताना छातीतून आवाज येणे
4 रात्री आणि सकाळी स्थिती गंभीर होणे
5 थंड हवेत श्वास घेतल्यावर त्रास होणे
6 कफ असलेला खोकला किंवा कोरडा खोकला
7 छातीत भरुन आल्यासारखे होणे
8 श्वास घेण्यास त्रास होणे

उपचाराची पद्धत

* दम्याची लक्षणे ओळखून वेळीच डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावा.
* जास्तीत जास्ती केसेसमध्ये इन्हेल्ड स्टेरॉइड आणि इतर अँटी इंफ्लामेटरी औषधे दिली जातात.
* ब्रोंकॉडायलेटर्स श्वसननलिकेतील मांसपेशींना आराम देते.
* इन्हेलरचाही उपचार म्हणून वापर केला जातो.
* वेळीच जर या आजाराचे निदान झाले आणि योग्य उपचार केले तर दमा किंवा अस्थमा दूर करणे शक्य आहे, असे ओन्ली माय हेल्थ या वेबसाईटने म्हटले आहे.