मुलांना ‘पॅरासिटामोल’ देताय? तारुण्यात होईल अस्थमा! ‘हे’ आहेत 6 धोके

paracetamol
PEN टाइम्स ऑनलाइन टीम : डोकेदुखी, अंगदुखी किंवा थोडा ताप आला तरी अनेकजण पॅरासिटामोलची गोळी घेतात. तसेच लहान मुलांनाही ताप आला की सतत पॅरासिटामोल सिरप दिले जाते. परंतु, हे महागात पडू शकते. कमी तापात आणि डोकेदुखी झाल्याने ही गोळी घेतल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
अनेक वर्षांपासून या गोळीचे सेवन केल्यास किडनी, लिव्हर आणि इतरही समस्या होऊ शकतात. ज्या लहान मुलांना सरुवातीच्या दोन वर्षात ताप आल्यावर सतत पॅरासिटामोल औषध दिले जात होते, त्यांना 18 वर्षांचे होईपर्यंत अस्थमा होण्याचा धोका वाढतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

पॅरासिटामोलचे साइड इफेक्ट्स

1 शरीरात अ‍ॅलर्जी आणि इन्फेक्शनची समस्याही वाढू लागते.
2 पोटाची समस्याही वाढण्याची शक्यता असते.
3 पचनक्रिया कमजोर होणे आणि पोटात गॅसची तक्रार वाढू शकते.
4 लिव्हरसंबंधी आजार वाढण्याची शक्यता वाढते.
5 किडनीसंबंधी आजार होण्याचाही धोका असतो.
6 शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.

 

(टिप: इथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.)