राज्यपालांविरोधात युवासेनेची “स्वाक्षरी मोहीम”

swakshari-mohim
पनवेल (संजय कदम) : हिंदुंमध्ये फुट पाडणार्‍या, मराठी माणसाचा सतत अपमान करणार्‍या राज्यपालांना केंद्राने परत बोलवून घ्यावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात युवासेनेमार्फत “स्वाक्षरी मोहीम” आयोजित करण्यात आली होती. यामोहिमेअंतर्गत पनवेल विधानसभा क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, पनवेल शहर येथे रविवार दि. ३१/०७/२०२२ रोजी स्वाक्षरी करून अनेक नागरिकांनी मोहिमेस पाठिंबा दिला.
यावेळी जिल्हा सल्लागार शिरिष बुटाला, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, जिल्हा समन्वयक नितिन पाटील, तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, उपमहानगरप्रमुख अच्युत मनोरे, शहरप्रमुख प्रवीण जाधव, शहरप्रमुख गुरुनाथ पाटिल, शहरप्रमुख यतीन देशमुख, शहर संघटिका अर्चना कुलकर्णी, उपशहर संघटिका उज्वला गावडे, उपशहरप्रमुख राहुल गोगटे, अनिल कुरघोडे, रोहित टेमघरे, विभाग प्रमुख गणेश म्हात्रे, जय महाराष्ट्र जीमचे संस्थापक यशवंत भगत, अध्यक्ष चंद्रकांत पाटील, जुनेद पवार, नुरुल्ला वाईकर, कुणाल कुरघोडे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाचे नियोजन विधानसभा अधिकारी पराग मोहिते, पनवेल शहर अधिकारी निखिल भगत, नविन पनवेल शहर अधिकारी जितेंदर सिद्धू, शहर समन्वयक साईसुरज पवार, उपशहर अधिकारी विराज साळवी, प्रभारी शहर अधिकारी आबेश ओंबळे, शहर चिटणीस सुयश बंडगर, युवतीसेना विभाग अधिकारी दिपाली चिखलेकर, विभाग अधिकारी कौस्तुभ गोजे, अमेय ठाकरे, श्वेता गोरे, सोशल मिडिया शहर अधिकारी सौरभ म्हामुणकर, शाखा अधिकारी ऋषिकेश घुले आदिनी केले होते.