मुलांना होणारा क्षयरोग म्हणजेच टीबी ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या !

kshay-rog
PEN टाइम्स ऑनलाइन टीम : जगातील पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या दहा लाख मुलांना दरवर्षी क्षयरोग म्हणजेच टीबी होतो. उपचार वेळीच न मिळाल्यामुळे त्यातील दोन लाख मुलांना आपले प्राण गमवावे लागतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
खोकला हे क्षयरोगाचे एकच लक्षण सर्वांना माहित असल्याने क्षयाचे निदान लवकर होत नाही. म्हणून लक्षणे जाणून घेतल्यास योग्य तपासणी करून उपचार करणे शक्य होऊ शकते. मुलांना टीबीपासून वाचवण्यासाठी ही लक्षणे जाणून घ्या.
ही आहेत लक्षणे
1 योग्य आहार आणि काळजी घेऊनही मुलांची वाढ होत नसल्यास वेळीच तपासणी करून घ्या.
2 काही मुलांच्या गळ्याच्या शिरा सुजलेल्या दिसतात. यामुळे वेदना होतात.
3 वारंवार थंडी लागणे, ताप येणे, घाम येणे.
4 पंधरा वर्षांपेक्षा लहान मुलांच्या छातीमध्ये सतत दुखत असल्यास वेळीच डॉक्टरांकडे जा.
5 तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, अचानक वजन घटणे.

 

(टिप: इथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.)