‘अ‍ॅस्प्रिन’ने टळू शकत नाही ‘हार्ट अटॅक’चा धोका! हे आहेत 4 धोके

asparin-tablet

PEN टाइम्स ऑनलाइन टीम : हार्ट अटॅकनंतर लगेच थोड्या प्रमाणात अ‍ॅस्प्रिन घेतल्यास मृत्यूचा धोका कमी केला जाऊ शकतो, असे यापूर्वीच्या एका संशोधनात दिसून आले होते. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात याउलट बाब समोर आली आहे.
अ‍ॅस्प्रिन घेतल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होत नाही, असे हे संशोधन करणार्‍या संशोधकांनी म्हटले आहे. अ‍ॅस्प्रिन एक सॅलिसिलेट औषधी आहे, जे वेदना आणि ताप कमी करण्यासाठी दिले जाते. या औषधाचे काही साईडइफेक्ट असून ते जाणून घेवूयात.
हे आहेत साइड इफेक्ट
1 हे सतत सेवन केल्याने इंटरनल ब्लीडिंगचा धोका असतो. कारण याने रक्त फार जास्त पातळ होते.
2 सोळा वर्षांच्या मुलांना हे दिल्यास त्यांच्या लिव्हरवर आणि मेंदुवर सूज येऊ शकते.
3 अस्थमा किंवा इतर श्वासासंबंधी आजाराने पीडित लोकांनी अ‍ॅस्प्रिन घेऊ नये. कारण याने त्यांच्या फुफ्फुसामध्ये आकुंचन निर्माण होऊ शकते.
4 काहींना अ‍ॅस्प्रिनचीही अ‍ॅलर्जी असू शकते.

 

(टिप: इथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.)