श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्याचे होणार वाटप

panvel-sai
पनवेल (संजय कदम) : पनवेल शहरातील श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पनवेल महानगरपालिका हद्दीतील १० शाळांतील ७०० गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष खेमचंद गोपलाणी यांनी दिली.
रविवार दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी २ वाजता श्री साईबाबा मंदिर पनवेल येथे या शैक्षणिक साहित्याचे वाटप होणार आहे. यामध्ये पनवेल शहर,कोळेश्वर विद्या मंदिर, मोठा खांदा, धाकटा खांदा,तक्का,पोदी, गुजराती,उर्दू शाळांचा समावेश आहे.
या कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमल, आयुक्त गणेश देशमुख उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी १० शाळांतील सुमारे १०० शिक्षकांचाही सन्मान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या शिक्षकांना शिर्डी यात्रेचेही आयोजन श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे अशी माहिती श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी रामलाल चौधरी, उपाध्यक्ष राम थदानी यांनी दिली.