पंचरत्न मित्र मंडळ मुंबईतर्फे वनवासी कल्याण आश्रम चिंचवली येथे विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप

gudhekar
मुंबई (शांताराम गुडेकर ) : समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत.या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात.या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य , कपडे , गृहोपयोगी वस्तू , औषधे , वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे.
समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड खजिनदार सचिन साळूंखे , उपाध्यक्ष रमेश पाटील , सहसचिव वैभव घरत , सल्लागार हनुमंता चव्हाण यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.मंडळाची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली असून आजपर्यत मंडळाच्यावतीने विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात.
पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबूर मुंबईतर्फे चिंचवली गाव, ता. पनवेल, जि. रायगड येथील वनवासी कल्याण आश्रम येथे शालेय विद्यार्थी वर्गासाठी वह्या, कंपसपेटी, अन्य शैक्षणिक साहित्य, ब्लॅकेट, चादर, बेडशीट, छती, चटई आणि खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. चारुशीला घरत (मा. उप महापौर, नगराध्यक्षा),तर विशेष पाहुणे म्हणून संतोष शिकतोडे (संचालक -जी. के. एस कॉलेज -खडवली ), अश्विन कांबळे (वरिष्ठ प्रबंधक मां. स. आर. सी. एफ ), जितेंद्र म्हात्रे (मा. सरपंच ), पंचरत्न मंडळ अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत प्रमुख पाहुणे आणि आयोजक यांच्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
सौ.चारुशीला घरत यांनी पंचरत्न मित्र मंडळ यांच्या सतत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. तर अश्विन कांबळे यांनी मार्गदर्शन करत यापुढेही असेच कार्य करत रहा अशा शुभेच्छा देत कार्यकर्ते यांचे कौतुक केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड,तसेच उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव वैभव घरत, सल्लागार हनुमंता चव्हाण, सभासद म्यॅथू.डिसोझा, डी. एस.मिश्रा,नीलम गावंड, राजलक्ष्मी नायडू इत्यादी उपस्थित होते.याप्रसंगी संतोष शिकतोडे सरांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच पंचरत्न मित्र मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
माणसाच्या आयुष्याची जडण घडणीत वह्या पुस्तकांच्या शिड्यांची भूमिका महत्वाची असते, वह्या पुस्तकांमुळेच मानवाची खऱ्या अर्थाने प्रगती होत असते असे प्रतिपादन मंडळ अध्यक्ष अशोक भोईर यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले .प्रत्येकाने समाजासाठी थोडे तरी योगदान दिले पाहिजे याच भावनेतुन पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबूर यांनी आपल्या आयुष्याच्या प्रगतीसाठी प्रयत्नाची सुरुवात करणाऱ्या बाल गोपालांना विनामुल्य शालेय साहित्य वाटप केले आहे, त्यांचे हे कार्य कौतुकास पात्र आहे असे मत अनेकांनी यनिमित्ताने व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मेस्त्री यांनी केले व आभार प्रदर्शन स्नेहा नाणीवडेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाला मदत करणारे सर्व देणगीदार व हितचिंतक यांचे मनापासून आभार व्यक्त करून यापुढेही आपले सर्वांचे असेच अमूल्य सहकार्य मंडळाला लाभेल