खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाचं उदघाटन; आता रुग्णांना मिळणार मोफत रुग्णवाहिका

sunil-tatkare
पेण (राजेश प्रधान ) : विशाल बाफना यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे पेण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेची सेवा पूर्णतः मोफत देण्याचा निर्णय युवा नेते विशाल बाफना यांनी वाढदिवसानिमित्त जाहीर केला. या रुग्णवाहिकेला लागणारे इंधन, ड्रायव्हर तसेच मेन्टेनन्स खर्च उचलण्याची जबाबदारी विशाल बाफना यांनी घेतली असून त्यामुळे येथील रुग्णांना तातडीने मोफत रुग्णवाहिका सेवा मिळणार आहे.  याप्रसंगी लीना बाफना यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा युवती सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
sunil-tatkare3
यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या रुग्णवाहिकेचा उपयोग गोरगरीब व गरजवंत रुग्णांना मोफत होणार आहे. रुग्णालयात रुग्णाला घेऊन जाताना रुग्णाच्या नातेवाईकांच्या आर्थिक फटका बसू नये यासाठी राष्ट्रवादीचे माजी शहर उपाध्यक्ष विशाल बाफना यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांचे हे सामाजिक कार्य निश्चित मोलाचे आहे.
sunil-tatkare2
राष्ट्रवादीच्या रुग्णवाहिकेतून गेलेला रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन त्याच रुग्णवाहिकेतून घरी यावा अशी सदिच्छा यावेळी खासदार तटकरे यांनी बोलून दाखविली. विशाल बापू ना यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या सुंदर संपर्क कार्यालयाचा उपयोग जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या  सोडविण्याकरिता होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
sunil-tatkare.1
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंत घासे, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, महिला अध्यक्ष चैताली पाटील, शहराध्यक्ष सुचिता चव्हाण, जिल्हा सरचिटणीस गंगाधर पाटील, चित्रपट निर्माते अशोक जैन, प्रसिद्ध व्यापारी सतीश सेवक, जिल्हा चिटणीस परशुराम मोकल, युवक अध्यक्ष विकास पाटील, शहर युवक अध्यक्ष सागर हजारे, जिल्हा महिला अध्यक्षा शालन सावंत, जिल्हा उपाध्यक्ष वसुधा पाटील जिल्हा सरचिटणीस मीनाक्षी पाटील, बंड्या शेठ पाटील, युवा नेते विजय कदम, डोलवी सरपंच अनिल म्हात्रे, वडखळ सरपंच राजेश मोकल, मळेकर सरपंच शरद पाटील आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.