आज तक लढे गोरोसें… अब लढना हैं चोरोसे – महेंद्र घरत

mahendra-gharat
कर्जत ( गणेश पवार ) : देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यावेळी ब्रिटिशांशी म्हणजे गोऱ्यांशी लढावे लागले होते. तर आता देशाला महागाईच्या माध्यमातून लुटू पाहणाऱ्या भाजपा विरोधात लढण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. असे सांगत आज तक लढे गोरोसें… अब लढना हैं चोरोसे अशी घणाघाती टीका जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी भाजप प्रणित केंद्र सरकारवर केली.
ते कर्जत तालुका काँग्रेस तर्फे आयोजित महागाई विरोधातील जनआंदोलनाप्रसंगी बोलत होते. शहरातील टिळक चौकात काँग्रेसच्या जनआंदोलनाला सुरुवात झाली. सर्व प्रथम जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी कार्यकर्त्यांसमवेत मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. बेरोजगारी कमी झाली पाहिजे…महागाई कमी झालीच पाहिजे… इंधनावरील दर कमी झालाच पाहिजे.आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी जिल्हाध्यक्ष घरत यांनी मोदी सरकारांच्या धोरणांवर सडकून टीका केली. या सरकारला प्रादेशिक पक्ष संपवायचे असल्याने अशा पक्षातील नेत्यांना ईडीची गुन्हे नोंदवून नामोहरण करण्याचा प्रयत्न भाजप सरकारनं करीत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात खाजगीकरण सुरु आहे. परिणामी देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. असे सांगत अनेक मुद्द्यांवरून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी चूल पेटवून त्यावर चहा करून गॅस दरवाढी विरोधात महिलांनी निषेध नोंदविला.
या जनआंदोलनात रायगड जिल्हा सहप्रभारी राणी अग्रवाल,खोपोली महिला शहर अध्यक्षा रेखा जाधव. जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, तालुका अध्यक्ष शिवाजी खारीक, तालुका कार्याध्यक्ष संजय गवळी, जिल्हा प्रतिनिधी प्रमोद राईलकर ,चंद्रकांत मांडे , हेमंत देशमुख, तालुका उपाध्यक्ष अरविंद कटारिया , नेरळ शहराध्यक्ष असिफ अत्तार, कर्जत शहर अध्यक्ष अनंत देवळे, जेष्ठ नेते अरविंद पाटील, विजय हरिश्चंद्रे , धनंजय चाचड, सुभाष मदन, संदीप पाटील, शेरखान पठाण, आवेश जुआरी, मनीष राणे, देविदास मसने, संतोष बदे, दत्तात्रेय सुपे आदी पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.