राशीभविष्य | 6 ऑगस्ट 2022 | आज ‘या’ राशीने राग आणि वाणीवर ठेवावे नियंत्रण, इतरांसाठी असा आहे दिवस, जाणून घ्या उपाय

– श्रीमती. सुरेखा भोसले, ज्योतिष आणि वास्तूशास्त्र तज्ज्ञ  892 85 90075
शालीवान शके 1944, 6 ऑगस्ट 2022, वार – शनिवार, श्रावण शु. 9, रास – वृश्चिक, तिथी – शु. नवमी, नक्षत्र – विशाखा, राहूकाळ – सकाळी 9 ते 11.30, या काळात शक्य असल्यास महत्वाची कामे करू नये. विवाहादि मंगलकार्य वर्ज्य नाही. मुलांक – 6, भाग्यांक – 2, ज्यांचा जन्म 2, 6, 11, 15, 20, 24 या तारखेला झाला आहे, त्यांना गुरूतुल्य व्यक्तींचा सहवास लाभेल.
1
मेष
व्यापार व्यवसायात कामाचा ताण वाढेल. सरकारी कामात अडथळे येण्याची शक्यता. भावंडांसाठी खरेदी कराल. नोकरदारांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळेल. अभ्यासात मेहनत वाढवावी. जोडीदाराशी समजुतीने वागा.
उपाय – बजरंग बाण 3 वेळा वाचावे.
2
वृषभ
क्रिएटिव्ह, जाहिरात क्षेत्रात प्रगतीचे योग संभवतात. गुंतवणुकीस उत्तम दिवस. सरकारी कामे लांबणीवर टाकावीत. गुरूतुल्य व्यक्तींचे सहकार्य मिळेल. अभ्यासात बौद्धीक मदत मिळेल. नवीन वास्तुचे योग संभवतात.
उपाय – मारूतीला 3 केळी देणे.
3
मिथुन
बाहेरच्या प्रांतातील लोकांना आर्थिक लाभ. वास्तुत आनंद निर्माण होणार्‍या घटना घडतील. अविवाहितांचे विवाह जुळण्याचे योग. आहारावर नियंत्रण असावे. अ‍ॅसिडीटी सतावेल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची साथ मिळेल.
उपाय – हनुमान वडवानल स्तोत्र वाचावे.
4
कर्क
नोकरीनिमित्त प्रवास होतील. सरकारी, कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील. वृद्ध व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. अभ्यासात लक्ष लागणार नाही. मन अस्वस्थ राहील. वास्तुत शांत रहावे.
उपाय – पिंपळाला पाणी घालून दिवा लावावा.
5
सिंह
आज न्यायासाठी कोर्टाची पायरी चढू नये. महतवाची कामे पुढे ढकलावीत. कमिशन संबंधीत कामात उत्तम यश मिळेल. आवडत्या व्यक्तीबरोबर प्रवास कराल. जोडीदारांची मर्जी मिळेल. अभ्यासात चांगल्या व्यक्तींचा सल्ला मिळेल.
उपाय – 5 कणकेचे दिवे मारूतीच्या देवळात लावावे.
6
कन्या
देवदर्शन मिळेल किंवा धार्मिक गोष्टीत मन रमेल. घरी पै-पाहुण्यांवर खर्च कराल. पाणी मात्रांची सेवा कराल. प्रेमसंबंधात अनुकूल दिवस. विनाकारण अनामिक भीती वाटेल. स्वतावर विश्वास ठेवा.
उपाय – हनुमान वडवानल 3 वेळा वाचावे किंवा श्रवण करावे.
7
तुळ
भागीदारीत घाई-गडबडीत निर्णय घेऊ नये. प्रेमीजीवांना समोरच्याच्या रागाला सामोरे जावे लागेल. श्वसनाचे बीपीचे त्रास होतील. जागेचे व्यवहार पुढे ढकला. नोकरदारांना अनुकूल दिवस. वेळेचे नियोजन असावे.
उपाय – चारमुखी दिवा देवळात लावावा.
8
वृश्चिक
प्रवासामुळे नवीन संधी उपलब्ध होण्याचे योग आहेत. फिरतीचे काम असणार्‍यांना अनुकूल दिवस. कोर्ट-कचेरी, पोलिस स्टेशन करू नये. गुंतवणुकीस उत्तम दिवस. नोकरदारांनी बेजबाबदार राहू नये. अभ्यास उत्तम होईल.
उपाय – दूध, पाणी, साखर पिंपळाच्या झाडला वाहणे.
9
धनु
डोळे, कान, दात यांचे आजार संभवतात. रागावर, वाणीवर नियंत्रण असावे. धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. नोकरीत महत्वाची कामे स्वता करावी. वाईट संगतीपासून दूर रहावे. बढती-बदलीचे योग.
उपाय – तिळाचे तेल दान द्यावे.
10
मकर
मनाविरूद्ध काही गोष्टी आज सहन करा. स्वता शांत असाल. दिवस चांगला आहे. हृदयविकार असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध राहतील. मौज-मजेकडे कल राहील.
उपाय – गाईला गुळ चारा देणे.
11
कुंभ
भागीदारीत आज जपून व्यवहार करावे. व्यवसायात नवीन संधी मिळतील. गुंतवणुकीस उत्तम दिवस. विवाह जुळण्याचे योग आहेत. देवदर्शन कराल. अनाठायी खर्च टाळा. अभ्यासात प्रगती आहे.
उपाय – तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावणे.
12
मीन
सरकारी कामे लांबणीवर टाकावीत. स्वताचे काम जबाबदारीने पार पाडाल. वरीष्ठांची शाबासकी मिळेल. आई-वडील, ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील. स्थावर प्रॉपर्टीच्या कामात अडथळे येतील. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.