अभिनेत्री मानसी नाईक, अमोल जाधव यांची कोंबडपाडा नवरात्र उत्सव मंडळाला भेट !

mansi-naike
पेण (राजेश प्रधान) : सुप्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री मानसी नाईक व प्रसिद्ध गित आई तुझा डोंगर फेम अमोल जाधव यांनी पेण शहरातील गणेश मित्र मंडळ कोंबडपाडा येथीलआई कोंबडपाडावासिनीचे दर्शन घेवुन  मंडळांच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांना नवरात्र उत्सव तसेच दसराच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अभिनेत्री मानसी नाईक हिच्या हस्ते आई कोंबडपाडावासिनी आरती मातेची पुजा करण्यात आली.
सोनाली पवार हीच्या हस्ते मानसी नाईक यांना शाल श्रीफळ व पुष्षगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले. तसेच अमोल जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आई तुझा डोंगर या गाण्याचे गायक अमोल जाधव यांनी विविध गाण्यांच्या माध्यमातून उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले. महीला मंडळ,अध्यक्षा स्मिता गुरव, नगरसेविका भावना बांधणकर, जयंवत पवार सोनाली अँकेडमीच्या मुला मुलीनी डान्स करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली. याप्रसंगी आयोजक गणेश पवार तसेच महीला मंडळ, गणेश मित्र मंडळ कोबंडपाडा अध्यक्ष, सदस्य हेमंत कवळे यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.