बेस्ट टुरिझम व्हिडिओ अवॉर्ड आणि मिसेस टुरिझम ग्लोब 2022 अवोर्डने पनवेलच्या नेरे येथील हर्षला योगेश तांबोळी सन्मानित

nere-tamboli
पनवेल (संजय कदम ) : मिसेस टुरिझम इंटरनॅशनल 2022 ही स्पर्धा नुकतीच थायलंड येथे पार पडली. यावेळी बेस्ट टुरिझम व्हिडिओ अवॉर्ड आणि मिसेस टुरिझम ग्लोब 2022 पनवेलच्या नेरे येथील हर्षला योगेश तांबोळी यांना मिळाले आहेत. हे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
नुकत्याच थायलंड येथे मदर हु केअर द वर्ल्ड म्हणजे आई जगाची काळजी कशी घेऊ शकते हे घोषवाक्य घेऊन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जगातून 23 स्पर्धक यात सहभागी झाले होते. तर भारत देशातून तीन स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.
यात पनवेलच्या हर्षला योगेश तांबोळी यांचा सहभाग होता. यावेळी टॅलेंट राउंड, टुरिझम प्रमोशन करणे, टुरिझम मिनिस्टर भेट, प्रधानमंत्री भेट, थायलंडच्या नागरिकांची भेट, फूड टेस्टिंग व स्पीच घेण्यात आले. त्यानंतर 23 महिलांमधून 15 जणींची निवड करण्यात आली.
15 महिला स्पर्धकातून टॉप 10 महिलांची निवड करण्यात आली. या टॉप 10 मधून टॉप पाच महिला निवडण्यात आल्या. यावेळी युनिव्हर्स, इंटरनॅशनल, वर्ल्ड, ग्लोब अर्थ हे पाच अवॉर्ड पाच महिलांना प्रदान करण्यात आले. तर क्वीन ऑफ द इयर हे सहाव्या महिलेला देण्यात आले.
पनवेलच्या नेरे येथील हर्षला योगेश तांबोळी यांना बेस्ट टुरिझम व्हिडिओ अवॉर्ड आणि मिसेस टुरिझम ग्लोब 2022 हे 2 पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.