कोणत्या वयात किती तासांची झोप गरजेची? जाणून घेवूयात

child-sleep
PEN टाइम्स ऑनलाइन टीम : उत्तम दर्जाची झोप ही अतिशय महत्वाची आहे. कारण, झोपेवर देखील आपले आरोग्य आवलंबून आहे. कमी झोपेमुळे आरोग्य बिघडू शकते. यासाठी पूर्ण आणि शांत झोप खूप महत्वाची आहे. परंतु, नक्की किती तासाची झोप घ्यावी, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. यासाठी वयानुसार किती तासांच्या झोपेची गरज असते याची माहिती घेवूयात.
वयानुसार अशी घ्या झोप
१ सहा ते नऊ वयोगटातील मुलांसाठी रात्री नऊ ते अकरा तास झोप आवश्यक. काहींना सात ते आठ तास झोप देखील पुरेशी आहे.
२ युवकांसाठी आठ ते दहा तास झोप आवश्यक. काहींना सात तास झोप ठीक आहे. मात्र अकरा तासांपेक्षा अधिक झोप घेणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
३ अठरा ते चौसष्ठ वयोगटातील प्रौढांसाठी सात ते नऊ तास झोप गरजेची.
४ पासष्ठ वर्षांवरील वृद्धांसाठी सात ते आठ तास झोप आवश्यक. मात्र सकाळी लवकर उठणारांना व दुपारी वामकुक्षी घेणारांना पाच तासही झोप पुरेशी असते.