मारुती एर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक; दोघांचा मृत्यू

aacident
पनवेल (संजय कदम) : पनवेल जवळील पळस्पे ते जेएनपीटी जाणाऱ्या मार्गावर पुष्पकनगर ब्रिजवर मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात मारुती एर्टिगा गाडीतील दोघे जण गंभीररीत्या जखमी होऊन मृत्यू पावल्याची घटना घडली आहे.
अलंकार पाटील (वय ३९ रा. आवरे) हा त्याच्याकडे असलेल्या मारुती एर्टिगा गाडीने पनवेल जवळील पळस्पे ते जेएनपीटी जाणाऱ्या मार्गावर पुष्पकनगर ब्रिजवर मध्यरात्रीच्या सुमारास जात असताना रस्त्याचकडेला असलेल्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून झालेल्या अपघातात हा स्वतः गंभीर जखमी झाला.
तसेच त्याच्या सोबत असलेला मोहिंदर गावंड (वय ३९ रा. आवरे) हा सुद्धा गंभीर जखमी झाल्याने त्यात त्यांचा हि मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.