रायगडात OBC समाज एकटवला ! जनमोर्चात आक्रमकतेची भूमिका; वेळ पडल्यास न्यायासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करू – प्रकाश आण्णा शेंडगें

obc-morcha
कोलाड (श्याम लोखंडे) : आता संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी बांधव आपल्या न्यायहक्कांसाठी पेटून उठणार असे चित्र गेली 18 नोव्हेंबर रोजी ओबीसी बांधवांकडून रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील जनमोर्चा प्रसंगी पहावयास मिळाले.
कायमस्वरूपी बजेटमधून त्यांच्या न्याहक्कांपासून वगळणाऱ्या सरकार विरोधात ओबीसींच्या एकजूटीचा एल्गाराला सुरुवात झाली अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रंचड आक्रोशात ओबींच्या मूलभूत न्यायहक्क व अनेक मागण्यासांठी ओबीसी बांधवानी रायगड जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक दिली तर आता महाराष्ट्रभर आंदोलन केल्या शिवाय हा ओबीसी समाज स्वस्त बसणार नाही असा इशारा ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे यांनी दिला.
या देशात झाडांची प्राण्यांची तसेच एस सी एन टी ची जातीनिहाय जनगणना केली जाते परंतु ओबीसींची जनगणना करण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. कुठे काय बिघडले देशात १९३१ नंतर ओबीसींची जनगणना सरकारने केलेली नसल्यामुळे एकूण ओबीसींची संख्या किती आहे त्याची जातनिहाय जनगणना करा आणि त्यानुसार आम्हाला आरक्षण मिळाला पाहिजे त्यामुळेच बारा बलुतेदार व अठरापगड जातींचा समावेश असूनही ओबीसी समाज शासनाच्या अनेक सोयी-सुविधांपासून व त्यांच्या न्यायहक्कांपासून आजही कायम वंचीत राहिलेला ओबीसी समाज हा मागासलेला समाज आहे.
ओबीसी समाजाला सरकार दरबारी शून्य बजेट मिळत आहे पुरेसा बजेट न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर आमच्यावर अन्याय होत आहे.त्यामुळे आम्हाला आमचा न्याहक्क कधी मिळणार याकरिता रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्च्या काढण्यात आला होता. त्यामुळे आता आम्ही हा अन्याय सहन करणार नाही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात असे मोर्चे यापुढे काढले जाणार असल्याचा इशारा ओबीसी जमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश आण्णा शेंडगे यांनी दिला आहे.
उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या या जनमोर्चात राज्य पदाधिकारी जनमोर्चा अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, सौ. प्रेमलता साली, महिला अध्यक्षा , चंद्रकांत बावकर कार्याध्यक्ष, जे.डी. तांडेल, दशरथदादा पाटील, नवीनचंद्र बांदिवडेकर ,अरविंद डाफळे ,संदेश मयेकर, दिपक म्हात्रे ,कृष्णा वणे सरचिटणीस, माधव कांबळे,भास्कर चव्हाण,संभाजी काजरेकर – समन्वयक चिटणीस तसेच रायगड जिल्हा पदाधिकारी अध्यक्ष सुरेश मगर उपाध्यक्ष सुदाम शिंदे,निलेश थोरे,सौ. अक्षरा कदम महिला अध्यक्षा,द्युम्न ठसाळ, सुरेश पाटील सरचिटणीस, विपुल उभारे युवक अध्यक्ष,अशोक पाटील,तालुका पदाधिकारी युवक उपाध्यक्ष महादेव पाटील,अरुण चाळके ,सचिन कदम, अनंत थिटे,सह रायगड जिल्ह्यातील तालुकास्तरावरील अध्यक्ष, म्हसळा, माणगांव,तळा ,रोहा ,अलिबाग, पोलादपूर, कर्जत, खालापूर, सुधागड पाली, उरण, पनवेल सह सर्व तालुक्यातील तमाम ओबीसी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी खा.सुनील तटकरे, आ.अनिकेत तटकरे,आ.अदिती तटकरे,माजी आमदार पंडितशेठ पाटील,धैर्यशील पाटील,ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष मा.प्रकाश अण्णा शेंडगे,कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर,जे डी तांडेल, शंकरराव म्हसकर,मधूकरशेठ पाटील,रामचंद्र सपकाळ,तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व ओबीसी प्रमुख पदाधिकारी आदींच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
रायगड, मुंबई, पालघर, ठाणे,रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. तर रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील या आंदोलनाला व मोर्चात सहभागी होत येणाऱ्या अधिवेशनात ओबीसींची जनगणना आणि इतर प्रमुख मागण्या प्रखरतेने मांडून समाजाला न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे मोलाचे मार्गदर्शन तमाम उपस्थित ओबीसी बांधवांना यावेळी केले.यावेळी रायगड जिल्ह्यातील सर्व आजी माजी ओबीसी आमदार तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यासह देशभरात ओबीसीचे संख्याबल अधिक आहे त्यामुळे ओबीसीला त्यानुसारच आरक्षण दिले गेले पाहिजे १९३१ नंतर संपूर्ण देशात ओबीसींची जनगणना सरकारने केली नाही त्यामुळे काहीसा हा ओबीसी समाज व त्याला शासनाच्या मिळणार्‍या सोयी सुविधा या पासून वचिंत राहिला आहे गेली अनेक वर्षे देशातील राजकीयदृष्ट्या पाहिले तर देशात बहुसंख्येने असलेला ओबीसी समाज हा मागासलेला आहे आर्थिक बळ नसल्याने त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक पात्रतेवर परिणाम होत आहे निवडणुकीत त्याला पुरेसा आरक्षण नसल्याने त्याची पिछेहाट होत आहे त्यामुळे जातनिहाय जनगणना सरकारने केलीच पाहिजे असल्याचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर यांनी प्रास्तविक करतांना सांगितले.
हे सरकार ओबीसी बांधवांच्या व्यथा समजून घेईल का ? नाहीतर महाराष्ट्रसह देशभरात संविधानिक पद्धतीने जन आंदोलन उभारुन ओबीसी बांधव सरकारला सळो की पळो करुन सोडल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.या जनमोर्चात अधिकाधिक ओबीसी समाज बांधवांनी एकत्रितपणे येऊन लढा दिले पाहिजे या आवाहनाला जिल्ह्यातील तालुका व विभाग स्तरावर गठित करण्यात आलेल्या ओबीसी संघटनेचे तालुका, विभागीय अध्यक्ष व विविध समाजाचे नेतेमंडळी यांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत आपला पाठींबा दर्शविला. कुणबी, आगरी, कोळी, तेली,शिंपी, सुतार,नाभिक, कुंभार, जंगम, माळी, परीट, धनगर, गोसावी, सह सर्व ओबीसींचे कार्यकर्ते उपस्थित ओबीसी समाजांनी सदरच्या मोर्चाला प्रचंड असा उत्स्फूर्तपणे पाठींबा दिला.
ओबीसींच्या विविध मागण्यांनी रायगड जिल्हातील जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग परिसर अक्षरशः दणाणून गेला हम लढेंगे मगर अभि पिछे हटेंगे नही ओबीसी समाजाची जनगणना होण्यासाठी देशात सर्वत्र लढा उभारण्यात येत आहे. याचबरोबर ओबीसी समन्वय समिती संलग्न जनमोर्चा महाराष्ट्र राज्य तसेच ओबीसी संघर्ष समिती अंतर्गत असलेल्या रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समितीनेही शुक्रवारी (दि.१८ नोव्हेंबर २०२२ रोजी ) अलिबाग येथे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला व या बाबतचे निवेदन रायगडचे जिल्हाधिकारी यांना दिले. तसेच आंदोलन व जनमोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकारी वर्गाने अथक परिश्रम घेतले व आंदोलन मोर्चा शांततेत संपन्न करण्यात आले.