दोन भामट्यांनी ६५ वर्षीय वृद्ध महिलेची केली फसवणूक

fraud
पनवेल (संजय कदम) : मोटार सायकल वरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक करून तिच्याकडे असलेली सोन्याची माळ फसवणूक करून काढून घेऊन पसार झाल्याची घटना करंजाडे वसाहती मध्ये घडली आहे.
मालिनी बाबर (वय ६५ रा.करंजाडे) या पायी त्या परिसरातून जात असताना दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले व त्यांनी तेथील शुक्ला मॅडमचा खून झाला आहे असे खोटे सांगून तुमच्या गळ्यातील सोन्याची माळ काढून ठेवा असे बोलण्यात गुंतवून सदर माळ काढून घेऊन त्यांनतर ते दोघेजण मोटार सायकलवरून पसार झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे मालिनी बाबर यांना लक्षात आल्याने त्यांनी या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली आहे.