कर्जत : माहाविकास अघाडी च्या वतीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व भाजपाचे खा. सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात फलक लावून जाहीर निषेध

karajat-andolan
कर्जत (गणेश पवार) : महाराष्ट्रचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमान कारक बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधात नेरळ शहरामध्ये तीन पक्ष एकत्र येऊन माहाविकास अघाडी च्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज च्या बद्दल अवमान कारक बेताल वक्तव्य करण्याऱ्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल,नेरळ शहरामध्ये माहाविकास अघाडीच्या वतीने आज नेरळमध्ये शिवाजी महाराज चौक येथे गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी ११ वाजता जाहीर निषेध करण्यात आला.
वेळोवेळी असे भाष्य करणारे आणि अगोदर हि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अवमान कारक भाष्य केलेले आहे परंतु वारंवार असे वक्तव्य ते करत असतात या वक्तव्यामुळे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष माहाविकास अघाडी ची मन दुखावलं आहे, म्हणून नेरळ शिवाजी चौक येथे आंदोलन व जाहीर निषेध करण्यात आले.
या प्रसंगी भरत भाई भगत जेष्ठ शिवसौनिक सुरेश गोमारे उपाध्यक्ष कर्जत भाई देसाई रोहिदास मोरे भाऊ क्षीरसागर हेमंत क्षीरसागर नेरळ शहर प्रमुख तर राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष भगवान चंचे धनाजी गरुड नेरळ शहर प्रमुख सादिक तांबोळी काँग्रेस पक्ष शिवाजी खारीक तालुका अध्यक्ष संजय गवळी कार्यध्याक्ष अरविंद कटारिया तालुका उपाध्यक्ष नेरळ शहर प्रमुख आसिफ अख्तर सर्व माहाविकास अघाडी कार्यकर्ते शिवसैनिक संतोष सारंग उपशहर प्रमुख सुमन ताई लोगले महिला तालुका उपाध्यक्ष माजी सभापती सुजाताताई मनवे जयश्री माणकामे सदस्य नेरळ ग्रामपंचायत भगवान जामघरे बाबू चव्हाण यांनी व्यक्त करून जाहीर निषेध व्यक्त केला.
या प्रसंगी उपस्थित पोलीस प्रशासनने योग्य सहकार्य केले . त्याबद्दल पोलीस प्रशासन मणापासून आभार मानले.