प्रशासक सुरेखा भणगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

surekha-bhangane.1
माथेरान (मुकुंद रांजाणे) : माथेरान नगरीच्या उत्तम प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे ( शिंदे) यांचा वाढदिवस नगरपरिषदेच्या कार्यालयात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. मागील एक वर्षांपासून माथेरान साठी अत्यंत तळमळीने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्याचप्रमाणे हे गाव आपलेच समजून स्वतःला कामांमध्ये झोकून देत त्यांनी आपल्या अल्पावधीतल्या काळात नागरिकांना अभिप्रेत असणारी कामे मार्गी लावली आहेत.
एक महिला अधिकारी असताना सुध्दा त्यांनी नागरिकांना वेळोवेळी अत्यावश्यक सेवा,लोकांच्या समस्या अडीअडचणी पूर्ण केल्या आहेत त्यामुळेच त्यांच्या वाढसदिवसाच्या वेळी विविध पक्षांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गर्दी केली होती.सोशल मीडियावर सुध्दा सुरेखा भणगे यांच्यावर सर्व हितचिंतकांनी शुभेच्छाचा मोठया प्रमाणावर वर्षाव झाला.
यावेळी अनेकांनी सुरेखा भणगे यांच्या कामाच्या पध्दतीवर  आपल्या छोटेखानी भाषणात स्तुतिसमने उधळली. माथेरानच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदा एखादया अधिकाऱ्यांना भरभरून प्रेम देणारी मंडळी यावेळी उपस्थित होती.
श्रमिक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, ई रिक्षाचे जनक सुनील शिंदे,  प्रकाश सुतार, शैलेश चाफेकर,जनार्दन पार्टे, पप्पू गायकवाड, दीपक रांजणे, दीपक डोईफोडे, शिवाजी साळुंखे, भारतीय जनता पक्षाचे राजेश चौधरी, प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव,राकेश चौधरी त्याचप्रमाणे नगरपालिका अभियंता स्वागत बिरंबोले, लेखापाल अंकुश इचके,कार्यालय अधीक्षक प्रवीण सुर्वे, राजेश रांजणे,नरेंद्र सावंत, अभिमन्यु येळवंडे, अन्सार महापुळे, ज्ञानेश्वर सदगीर, अजय साळुंखे, प्राजक्ता कदम, स्नेहा साखळकर,नम्रता गोरे,सोनल कदम, अर्चना ढेबे, जयवंत वर्तक, उमेश मोरे, लक्ष्मण दरवडा, रामदास धोत्रे आदी उपस्थित होते.
—————————–
कार्यालयातील सर्व कर्मचारी हे माझे कुटुंबच असून त्यांचे सहकार्य नेहमीच मिळते.आम्ही प्रामाणिकपणे कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. इथल्या लोकांचं खूप प्रेम आहे हे आजच्या या छोटेखानी कार्यक्रमावरून दिसत आहे. पुढील पंचवीस वर्षे अजून माझी सेवा बाकी आहे त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहणार आहेत. मी एक माथेरानची नागरिक या नात्यानेच मी कामे करत आहे.
——सुरेखा भणगे (शिंदे), प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद