पनवेल परिसरात आढळला महिलेचा मृतदेह

murder-mahila
पनवेल (संजय कदम) : पनवेल परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर अनोळखी महिलेचे अंदाजे वय ५५ ते ६० वर्ष इतके आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२- २७४५२३३३ किंवा सपोनि श्रीकांत शेडगे यांच्याशी संपर्क साधावा.