आज महाडमध्ये फक्त २ नवे रुग्ण; ६ बरे झाले तर १२ जणावर उपचार सुरु

corona17

महाड ( रवि शिंदे ) : आज महाड तालुक्यात कोरोनाचे फक्त २ नवीन रुग्ण ६ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर आता फक्त १२ रुग्णांवर उपचार सुरु असून तालुक्यात आता खऱ्या अर्थाने ” गो कोरोना ” म्हटल्यास वावग ठरणार नाही.

आज महाड तालुक्यात नवीन २ आढळूण आलेल्या रुग्णापैकी दासगाव ५१ पुरुष तर सुदर्शन केमिकल बिरवाडी १६ महिला यांचा समावेश आहे.

महाड तालुक्यात आता पर्यंत कोरोनाचे एकुण रुग्ण नोंद १७२८ असून आता फक्त आणि फक्त १२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तब्बल १६४२ जणांनी कोरोनावर यशस्वि मात केली आहे. तर दुदैवी ७४ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.